Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : पोलिस उपनिरीक्षक संभाजी धेंडे यांचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू

सांगली : पोलिस उपनिरीक्षक संभाजी धेंडे यांचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू
 

कुपवाड : सांगली पोलिस दलातील राष्ट्रीय खेळाडू, उपनिरीक्षक संभाजी नाना धेंडे (वय 56, मूळ गाव एरंडोली, ता. मिरज, सध्या रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर, कुपवाड) यांचा विषारी द्रव प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांना मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवार, दि. 27 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

संभाजी धेंडे हे कुपवाड येथील प्रकाशनगर-अहिल्यानगर येथे पत्नी, मुलगा, दोन मुलींसह राहत होते. सांगली जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना धेंडे यांनी पोलिस मुख्यालय, कोकरूड, विश्रामबाग, एम.टी. सेक्शन (पोलिस मुख्यालय, सांगली) येथे सेवा बजावली होती. सध्या ते पोलिस उपअधीक्षक (मिरज विभाग) कार्यालयात पोलिस उपनिरीक्षक पदावर सेवा बजावत होते. 
 
राष्ट्रीय खेळाडू व मल्ल असलेल्या धेंडे यांनी अनेक क्रीडा स्पर्धा गाजविल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने ते घरीच होते. दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा मुलगा संदेश धेंडे यांनी त्यांना मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विश्वजित गाडवे करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.