पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं; तिघांचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.
पिंपरी -चिंचवडच्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. पुणे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.