Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?

सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?
 

पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी गाठीभेटी, मुलाखती, दौरे,पक्षप्रवेश यांना वेग आला आहे, अशातच महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे.

अशातच पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. अशातच काल(मंगळवारी) मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे. मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला होता. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाणारी ती व्यक्ती कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काही दिवसांपुर्वी हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश पार पडला. यानंतर आता शरद पवार गटात आणखी एका बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसलेल्या एका नेत्यानं आपला चेहरा लपविल्याचं दिसून आलं. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणारा ‘तो’ नेता नेमका कोण? असा सवाल केला जात आहे. पुण्यातील मोदी बागेतून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने मीडियापासून आपला चेहरा लपवला. सुप्रिया सुळे यांच्या गाडीमध्ये पुढे सुप्रिया सुळे बसल्या होत्या आणि मागच्या बाजूला खिडकी जवळच्या सीटवर एक व्यक्ती बसला होता. त्याने आपला चेहरा फाईलने झाकला होता. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण? अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे.तो नेता कोण?
सुळेंची कार मोदी बागेतून बाहेर पडली तेव्हा माध्यमांचे कॅमेरे फुटेज घेण्यासाठी पुढे आले. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने माध्यमांपासून चेहरा लपवला, गेटच्या बाहेर पडताना त्यांनी हातात फाईल घेऊन चेहरा झाकला. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये बसलेली ही व्यक्ती कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांनी इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी इंदापूरात दिले संकेत

सोमवारी पार पडलेल्या इंदापूरातील हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी आणखी पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते. शरद पवार पक्षप्रवेशावेळी बोलताना म्हणाले, 'चित्र बदलतंय. आज हाच कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला. त्यांनी हट्ट केला. इंदापुरला चाललाय, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. मी म्हटलं, काय कार्यक्रम आहे? ते म्हणाले, इंदापुरला आहे, तोच आमच्याकडे. म्हटलं कुठे? ते म्हणाले फलटणला", असं शरद पवारांनी सांगितले. त्यानंतर हसतच त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, "समजलं का?', पवारांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.