सुधीरदादांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा मंत्री चंद्रकांतदादा पाटील:सांगलीत भाजप मजबूत, एकसंघ
सांगली, दि.२६ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले. आज मंत्री पाटील सांगलीमध्ये आले. त्यांनी येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघात प्रचंड विकास कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सांगलीतून लढण्याचा आदेश पक्षानेच दिला आहे. त्यांच्यासारख्या प्रामाणिक, निष्ठावान आणि कार्यतत्पर आमदाराला विधानसभेत पुन्हा पाठवणे अत्यावश्यक आहे.त्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागा. गेल्या दहा वर्षात सांगलीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुधीरदादांनी केले आहे.
मंत्री पाटील म्हणाले, सांगलीमध्ये मी आज सर्व प्रमुख नेत्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर बोललो आहे. सांगली विधानसभा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुती अत्यंत मजबूत आहे. एकसंघ आहे. या एकीच्या आणि लोकशक्तीच्या बळावर आपल्याला पुन्हा एकदा सांगलीसह जिल्ह्यात महायुतीचा विजय खेचून आणायचा आहे. महाराष्ट्राला आणखी समृद्ध, सशक्त आणि विकसित करण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी एकजुटीने कामाला लागा.दरम्यान प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष म्हणून शेखर इनामदार, सांगली जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)पदी दीपकबाबा शिंदे आणि भारतीय जनता मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी पैलवान धीरज सूर्यवंशी यांची आज निवड करण्यात आली. तिघांचेही मंत्री पाटील यांनी अभिनंदन केले. कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग,नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराजभैय्या पवार,नूतन युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, श्रीकांततात्या शिंदे आदि उपस्थित होते.
भेटीगाठी चर्चा आणि संवाद
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सांगलीत शेखर इनामदार,माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, गौतम पवार, सौ. नीता केळकर, धीरज सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील शनिवारी सांगलीत आले. त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. सोबत आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रकाश ढंग ,पृथ्वीराजभैय्या पवार, शेखर इनामदार, दीपकबाबा शिंदे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.