Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सद्गुगुरू वामनराव पै यांचे 'हे' पंचासुत्र पाळा, मुलांना नक्कीच होईल फायदा.

सद्गगुरू वामनराव पै यांचे 'हे' पंचासुत्र पाळा, मुलांना नक्कीच होईल फायदा.


जर पालक वर्किंग असतील तर मुलांच संगोपन करणे हे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. अशावेळी पालकांनी मुलांना अगदी शाळेच्या सुरूवातीपासून पंचसुत्रीचा अवलंब करायला लावणे हे महत्त्वाचे असते.

जर तुमचे मुलं अभ्यास करत नसतील तर या सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या 'पंचसूत्री'चा वापर नक्की करा.

श्री वामनराव पै एक महान समाजसुधारक, आणि एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेता आणि नाविन्यपूर्ण जीवनविद्या, जीवनाचे विज्ञान आणि सुसंवादी आणि यशस्वी जीवन जगण्याची कला, तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक यांचा जन्म मुंबई येथे २१ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. ते एक स्व-प्रेरित व्यक्ती होते आणि लोकांबद्दल उच्च पातळीवरील सहानुभूती आणि काळजी असलेले व्यक्तिमत्व होते. प्रत्येक मानवाला आनंदी बनवायचे आणि जगाला राहण्यासाठी अधिक चांगले ठिकाण बनवणे हा त्यांच्या निःस्वार्थ प्रयत्नाचा एकमेव उद्देश होता. प्रत्येक पालकांनी वर्षाच्या सुरूवातीपासूनच मुलांना काही गोष्टी शिकवणे गरजेचे असते. कारण मुलांच्या प्रगतीमध्ये शाळा, शिक्षकांसोबतच पालकांचा देखील खूप मोठा वाटा असतो. जर पालक वर्किंग असतील तर मुलांच संगोपन करणे हे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. अशावेळी पालकांनी मुलांना अगदी शाळेच्या सुरूवातीपासून पंचसुत्रीचा अवलंब करायला लावणे हे महत्त्वाचे असते. जर तुमचे मुलं अभ्यास करत नसतील तर या सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या 'पंचसूत्री'चा वापर नक्की करा.

मुले अभ्यास करत असताना अनेकदा मेंदू आणि डोळ्यांवर सर्वाधिक ताण पडतो. यामुळे मुलांच्या शरीराच्या इतर अवयवांचा व्यायाम होणे देखील गरजेचा असतो. त्यामुळे मुलांना दररोज एक तास मैदानी खेळ खेळायला पाठवावे. यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक व्यायाम होतो.

मुलं जास्त मोबाईचा वापर करत असल्यामुळे प्रत्येक पालकांची तक्रार आहे. जर तुम्हाला स्मार्टपणे या परिस्थितीला हाताळायचे आहे. तर मुलांना ठराविक वेळेपुरताच मोबाईल द्या. त्याच बरोबर मुलं मोबाईलमध्ये काय पाहतात याकडे लक्ष द्या.
मुलांच्या वाढत्या वयामध्ये योग्य आहार देणे गरजेचे असते. पालक म्हणून त्यांचे लाड करणे जितके गरजेचे असते तितकेच त्यांना शिस्त लावणे महत्वाचे असते. घरातील प्रत्येकासाठी ताटातील प्रत्येक पदार्थ संपवायचा हा नियम असणे गरजेचे आहे.

अनेकदा मुलं शाळेतला अभ्यास वेळेवर पूर्ण करत नाहीत. या सर्वांचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो. यामुळे पालकांनी अगदी शाळेच्या सुरूवातीपासूनच मुलांना होमवर्क पूर्ण करण्याची सवय लावावी. सगळ्या पालकांनी मुलांना शाळेत काय शिकवलं गेलं आहे याकडे पूर्ण लक्ष द्यावं.

पालक मुलांसोबत सतत राहू शकत नाहीत. यावेळी पालकांनी सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्या 'विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे' या ग्रंथात सांगितलेली त्रिसूत्री शिकवावी. याग्रंथामध्ये मुलांना रिड, रिमेम्बर आणि रिप्रोड्यूस हे 3R सांगितले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.