श्रीकांत शिंदे यांच्या मेव्हण्याला तिकीट दिलं तर पराभव नक्कीच, रामदास
भाईंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा; शिवसेनेत नक्की काय घडतंय?
एकनाथ शिंदे आणि त्यांचा चिरंजीवाने एका नातेवाईकाला गुहागरमध्ये उमेदवार म्हणून दिला तर शिवसेना हे सहन करणार नाही. तर त्याला पराभवाचा सामना करावा लागेल हे सांगण्यासाठी कुणा जोशी नावाच्या ज्योतिषाची गरज नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटातील रत्नागिरीतील नेते रामदास कदम यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा विपुल
कदम यांना गुहागर येथून उमेदवारी मिळण्याची चर्चा असून त्याला आता
शिवसेनेतूनच विरोध सुरु झाला आहे.
गुहागर विधानसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना तिकीट देणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर शिवसेनेचे खेड येथील आमदार रामदास कदम यांनी परखड प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटतं नाही. अचानक बाहेरचा उमेदवार दिला तर येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच अन्याय केल्या सारखे होईल असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
तर मतदार संघात पाय ठेवणार नाही
विधानसभा निवडणूकांची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे.सर्वत्र जागा वाटपाचे सूत्र ठरत असताना कोकणातील जागांवरुन महायुतीतच जुंपली आहे. रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. ते म्हणाले की विपुल कदम कोण ? त्यांचा गुहागर मतदार संघाशी संबंध काय ? शिवसैनिकांनी वर्षांनुवर्षे काम केलेले आहे. त्यांना डावलून जर मुखमंत्र्यांचे चिरंजीव आपल्या नातेवाईकांना संधी देणार असतील तर येथील शिवसैनिकांना ते भावेल असे मला वाटत नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल.नातेवाईक म्हणून विपुल कदमना सीट दिली तर त्याचा पराभव नक्की होईल असेही रामदास कदम यांनी सांगत ते पुढे म्हणाले की जर विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा. पण मी गुहागर विधानसभा मतदार संघात आपण पाय ठेवणार नाही असाही इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.