Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत मोठा घोळ, संजय राऊतांनी सांगितली चूक

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत मोठा घोळ, संजय राऊतांनी सांगितली चूक
 
 
मुंबई : महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक सुरू असतानच शिवसेना ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात आली, पण या यादीमध्ये चूक असल्याचा दावा खुद्द संजय राऊतांनी केला आहे. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी संजय राऊतांनी या यादीमध्ये चूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. 'शिवसेनेच्या मुख्यालयातून आलेल्या यादीत काही करेक्शन आहेत. काहीतरी प्रशासकीय चूक झाली आहे. अशी चूक कशी होऊ शकते? याबाबत अनिल देसाई पाहतील, कारण ते पक्षाचं प्रशासकीय काम पाहतात', अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून एकूण 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

समसमान जागावाटप

दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या पक्षात समसमान जागावाटप झालं आहे. आमचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला क्लिअर झाला आहे. आता उरलेल्या 18 जागांबाबत मित्रपक्षांसोबत उद्यापासून चर्चा करू. या जागांवर अनेकांचा दावा असला तरी यातून मार्ग काढला जाईल. यातल्या काही जागांबाबत शेकापचा दावा आहे, काही जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांचा दावा आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

किती जागांवर तिढा कायम?

85-85-85 जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्यामुळे 255 जागांचा तिढा सुटला आहे, तर 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत, त्यामुळे 15 जागांचा वाद अजूनही निवळला नाही, हे यातून दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.