अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या तहसीलदारांविरोधात तक्रार
कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डूम हे कार्यालयातील महसूल कर्मचारी व नायब तहसीलदार यांना मानसिक त्रास देतात. तसेच अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात.
याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा महसूल कर्मचारी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेने याबाबतचे निवेदन १४ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरची तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी तहसीलदारांच्या दबावाखाली काम करत आहेत. कर्मचारी मानसिक तणावात आहेत. तहसीलदारांच्या त्रासामुळे तहसीलमधील काही नायब तहसीलदार व कर्मचारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत. मागील वर्षी गोदाम लिपिकाचा मानसिक तणावाने मृत्यू झाला. शिवीगाळ व दबाव टाकलेल्या प्रसंगाचे ऑडिओ रेकॉर्डिंग महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर देंगे, महिला प्रतिनिधी सोनाली कंकलवार, संघटक अल्पेश बारापात्रे उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.