रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
पांढरे आणि चमकणारे दात तुमचे हास्य अधिक सुंदर आणि आकर्षक बनवतात, तर पिवळे दात आत्मविश्वास कमी करतात. परंतु अनेकांचे दात कितीही वेळा घासले तरीही नेहमी पिवळे राहतात.
असे नक्की का होते याचे कारण तुम्हाला माहीत्ये का? जर तुम्ही देखील दात पिवळे होण्याने त्रस्त असाल आणि ते दूर करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला त्याची कारणे आणि ते दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय या लेखातून सांगत आहोत.
काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही दातांचा पिवळेपणा त्वरीत दूर करू शकता. मात्र त्याआधी तुम्हाला दात पिवळे का होतात याचे कारण माहीत असायला हवे. या लेखातून दंतचिकित्सक डॉ. हरिश तन्ना यांनी दात पिवळे होण्याची कारणं आणि उपाय तुम्हाला सांगत आहोत. (फोटो सौजन्य - iStock)
काय आहे कारण
दात पिवळे होण्याचे कारण काय आहे
दात पिवळे होण्यासाठी खाण्याच्या सवयी कारणीभूत असतात. चहा, कॉफी, रेड वाईन, सॉस, चॉकलेट्स अथवा सतत गोड पदार्थ इत्यादी खाल्ल्याने दात पिवळे पडू शकतात. याशिवाय आंबट फळे खाल्ल्याने दातांचा इनॅमल पातळ होतो. त्यांचे कमी प्रमाणात सेवन करायला हवे. फळे आरोग्यासाठी नक्कीच चांगली असतात, मात्र त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. जास्त साखर खाल्ल्याने दातांनाही नुकसान होते. साखर खाल्ल्याने दातांचा बाहेरील पांढरा थर खराब होतो. मिठाई खाल्ल्याने तोंडात ॲसिड वाढू शकते ज्यामुळे दात पिवळे होऊ शकतात.
याशिवाय सिगारेट ओढल्यानेही दात पिवळे पडू शकतात. धुम्रपानातून बाहेर पडणारे निकोटीन आणि टार दातांना हानी पोहोचवतात. यामुळे दात आणि हिरड्यांची समस्या उद्भवू शकते. धुम्रपानाची वाईट सवय सोडून द्यावी.
ॲपल साईडर व्हिनेगर
ॲपल साईडर व्हिनेगरचा करा वापर
ॲपल साईडर व्हिनेगरमध्ये असलेले ॲसिड दात स्वच्छ करण्यासाठी प्रभावी आहे. ही घरगुती पद्धत वापरण्यासाठीही सोपी आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा. या पाण्याने स्वच्छ धुवा आणि हळूहळू दातांचा पिवळेपणा निघून जाईल. तुम्ही याचा नियमित वापर करून घेऊ शकता.
नारळाचे तेल
पिवळ्या दाताच्या स्वच्छतेसाठी वापरा नारळाचे तेल
पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा खोबरेल तेल घ्या आणि सुमारे 10 मिनिटे गार्गल करा. खोबरेल तेलामध्ये असलेले लॉरिक ॲसिड दात पांढरे करण्यास मदत करते. दातांवर खोबरेल तेलाचा चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे दात लवकर स्वच्छ होतात.
लिंबू आणि बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आणि लिंबू आहे उत्तम उपाय
लिंबू आणि बेकिंग सोडा दातांवर साचलेली घाण काढून टाकण्यासाठी आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी उत्तम आहे. हे दातांवर जमा झालेले प्लेक आणि टार्टर काढून टाकते. एक चमचा सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा. ही दातांवर घासून 2 मिनिटांनी धुवून टाका. अगदी खळखळून चूळ भरा आणि लवकरच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.