Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या कल्याणासाठी सुधीरदादा तुम्हीच आमदार हवेततरुण व्यायामपटूंनी व्यक्त केल्या भावना; सुधीरदादांची व्यायामशाळेला भेट

सांगलीच्या कल्याणासाठी सुधीरदादा तुम्हीच आमदार हवेत तरुण व्यायामपटूंनी व्यक्त केल्या भावना; सुधीरदादांची व्यायामशाळेला भेट
 

सांगली, दि.२८: दादा तुम्हीच आमचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले पाहिजे. तुमच्यामुळेच सांगलीचा विकास झालेला आहे. सांगली आणखी चांगली करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या कल्याणासाठी  तुम्हीच पुन्हा विधानसभेत गेले पाहिजे, अशा भावना आज तरुण व्यायामपटूंनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या.

सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सोमवारी सकाळी येथील एस.टी. स्टँड परिसरातील एका व्यायामशाळेस( जिम) भेट दिली. तेथील व्यायामपटूंच्या  बरोबर संवाद साधला. त्यावेळी व्यायामशाळेचे चालक संग्राम मोहिते, प्रशिक्षक विनायक सोनवणे यांच्यासह सर्व व्यायामपटूंनी दादांचे  सहर्ष स्वागत केले.

व्यायामपटू म्हणाले ,दादा तुम्ही गेल्या दहा वर्षात सांगलीसाठी भरपूर काम केले आहे. आता नव्या पिढीच्या तुमच्याकडून आणखी अपेक्षा आहेत. सांगलीच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन तुमच्याकडेच आहे. त्यासाठी तुम्हीच पुन्हा सांगलीतून विजयी झाले पाहिजे.आम्ही त्यासाठी तुमच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत. आमच्या भागात तुमचा प्रचार करणार आहोत.
सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी व्यायामाचे विविध प्रकार आणि व्यायामाची साधने याबद्दल व्यायामपटूंच्या बरोबर चर्चा केली. यावेळी कलानगर मित्र परिवारातर्फेही दादांचे स्वागत करण्यात आले. कलानगर मित्र परिवाराचे अभिजीत मिरासदार, पोपट जमदाडे, गणेश गुजर आदि उपस्थित होते.

फोटो 
 
सांगली: एसटी स्टँड परिसरातील एका व्यायामशाळेस आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सोमवारी सकाळी भेट दिली. तेथील व्यायामपटूंच्याबरोबर संवाद साधला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.