Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१ हजाराची लाच घेताना तलाठ्यासह एकजण 'एसीबी'च्या जाळ्यात

१ हजाराची लाच घेताना तलाठ्यासह एकजण 'एसीबी'च्या जाळ्यात
 

जळगाव : सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याच्या मोबदल्यात १ हजारांची लाच घेणाऱ्या तलाठीसह एका खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे ( वय 34) ( वर्धमान जैन, पारोळा), खाजगी पंटर शरद प्रल्हाद कोळी (वय ४३ रा. चोरवड ता.पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.३०) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात तक्रारदार हे आपल्या परिवाराचा वास्तव्याला असून कुटुंबियांच्या नावे त्यांचे लोणी बुद्रुक शिवारात शेत आहे. या शेतजमिनीवर तक्रारदार यांना गावातील 'विविध कार्यकारी सोसायटी'मधून कर्ज घेण्यासाठी त्यांच्या शेतजमिनीवर असलेल्या सातबारा उताऱ्यावर बोजा लावणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार हे चोरवडी येथील तलाठी कार्यालयातील तलाठी सुभाष वाघमारे यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुमच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्यांचे प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८०० रुपये आणि मागील कामाचे दोनशे रुपये असे एकूण १ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानुसार तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याप्रकरणी जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली. दरम्यान पथकाने आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता सापळा रचला. त्यानंतर तलाठी वाघमारे याने तक्रारदाराला खाजगी पंटर शरद कोळी यांच्या फोनपेवर पैसे टाकण्यास सांगत लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याने पथकाने दोघांना अटक केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.