Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'बिसलेरी'ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना 'बिलसेरी' मिळाली अन्..; पुढे काय घडलं ते पाहा

'बिसलेरी'ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना 'बिलसेरी' मिळाली अन्..; पुढे काय घडलं ते पाहा
 

भारत हा जुगाडू म्हणजेच काहीही तडजोड करुन वेळ मारुन नेणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र या जुगाडू विचारसरणीच्या नादात अनेकदा खऱ्या गोष्टींचं नामसाधर्म्य असणाऱ्या ड्युप्लिकेट गोष्टीही तयार केल्या जातात. अनेकदा तुम्हीही नामवंत ब्रॅण्डचे ड्युप्लिकेट ब्रॅण्ड बाजारात पाहिले असतील. मात्र ही अशी चोरी पकडली गेली की काय होतं याचा प्रयत्न नुकताच उत्तर प्रदेशमधील बागत येथे आला.

 
कसा समोर आला हा प्रकार?

उत्तर प्रदेशमधील बागपतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर एका नामवंत कंपनीच्या नावाला साधर्म्य असणाऱ्या कंपनीची बाटली मिनरल वॉटरची बाटली म्हणून ठेवण्यात आली. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हायातील खाद्य विभागात एकच गोंधळ उडाला. खऱ्या नावात थोडा फेरफार करुन अगदी हुबेहुब ब्रॅण्डेड पाणी वाटावं अशा या बाटल्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांना धक्काच बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी खाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून याबद्दलची माहिती दिली.

त्यानंतर नेमकं घडलं काय?

थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच आक्षेप नोंदवल्यानंतर अन्न आणि प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'बिसलेरी' या नामवंत ब्रॅण्डच्या नावाशी मिळत्या जुळत्या 'बिसल्लेरी', 'बिसलारी', 'बिलसेरी' या सारख्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या असलेल्या दुकानांवर तसेच गोदामांवर छापेमारीला सुरुवात केली. या छापेमारीमध्ये मोठ्याप्रमाणात बनावट मिनरल वॉटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या पुढाकारानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी तातडीने या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक खाद्य सुरक्षा आयुक्त मनवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील टीमने छापेमारी केली. त्यामध्ये बनावट नावाने चालणाऱ्या कंपनीतील बाटल्या जप्त करण्यात आल्या.

एका घरात सापडला गुप्त कारखाना

'बिसलेरी' ब्रॅण्डच्या नावाशी मिळत्या जुळत्या 'बिसल्लेरी', 'बिसलारी', 'बिलसेरी' या सारख्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या दुकानादारांवर कारवाई करण्यात आली. तसेच मोठ्याप्रमाणात या नकली ब्रॅण्डच्या बाटल्या जाप्त करण्यात आल्या. याच कारवाईदरम्यान बागपतमधील गौरीपूर जवाहर नगर गावामध्ये कोणताही परवाना न घेता एका घरात पाण्याच्या बाटल्या भरुन या खोट्या ब्रॅण्डखाली विकण्याचा उद्योग चालू असल्याचा भांडाफोडही झाला. या कारखान्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईचे व्हिडीओही समोर आलेत... या कारखान्यांना बाटल्या पुरवणाऱ्यांविरोधातही कारवाई झाल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईत जप्त केलेल्या बाटल्या जाळून नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर त्या गाडून टाकण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.