Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हरियाणात काँग्रेसची लाट, केजरीवालांच्या 'आप'ची लागली वाट, झाडून सुपडा साफ?

हरियाणात काँग्रेसची लाट, केजरीवालांच्या 'आप'ची लागली वाट, झाडून सुपडा साफ?
 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 4 महिन्यानंतर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पण या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. हरियाणा भाजपच्या ताब्यातून जात असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. इथं काँग्रेसचं सरकार येणार अशी चिन्ह आहे. तर या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही ताकद लावली होती. पण मतदारांनी केजरीवालांच्या आपकडे पाठ फिरवली आहे.



देशाचे लक्ष लागलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडलेले असून एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. न्यूज 18 च्या महापोलमध्ये काँग्रेसने हरियाणामध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. 59 जागा जिंकतील असा अंदाज आहे. तर भाजपला फक्त 21 जागांवर समाधान मानावे लागेल. तर जेजेपी गठबंधन 2 जागा, इनेलो आघाडी 4 आणि आम आदमी पार्टीला शुन्य जागा मिळेल. 

News18 इंडिया महापोल 

काँग्रेस+ = 59
भाजप = 21
जेजेपी+ = 2
इनेलो+ = 4
आम आदमी पार्टी = 0
इतर = 4

रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय होणार असल्याचा अंदाज

आम आदमी पक्ष- 00 जागा
भाजप- 18-24 जागा
काँग्रेस- 55-62 जागा
इंडियन नॅशनल लोकदल आणि बसप युती 3-6 जागा मिळण्याचा अंदाज

आप - ००
हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला (शनिवारी) एकाच टप्प्यात मतदान संपन्न झाले. पाठोपाठ चार दिवसांमध्ये ८ ऑक्टोबरला हरियाणाचा निकाल येणार आहे. याच दिवशी जम्मू काश्मीर विधानसभेचाही निकाल लागणार आहे. शेतकरी आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळण्यात भाजपला आलेल्या अपयशाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता

हरियाणामध्ये सलग १० वर्षे भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत. त्यामुळे हरियाणात यंदा सरकारविरोधी लाट असल्याचे बोलले जाते. शेतकरी आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळण्यात भाजपने केलेल्या चुकांचा मोठा फटका त्यांना विधानसभा निवडणूक निकालांत बसण्याचा अंदाज आहे. त्याचमुळे काँग्रेसला पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

सरकारविरोधी जनमताच्या लाटेचा अंदाज आल्यानेच विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रातील शीर्षस्थ नेतृत्वाने मनोहरलाल खट्टर यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेऊन नायब सिंह सैनी यांच्याकडे सूत्रे सोपवली. नेतृत्व विरोधी भावनेचा फटका बसणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न भाजपने केला.
हरियाणातील जातींची समीकरणं

भाजपने शेतकरी आंदोलन चिरडल्याने हरियाणात प्रमुख जाट समूह काँग्रेसच्या बाजूने असल्याचे दिसून येते. जाट, मुस्लीम आणि दलित मतांच्या आधारे भाजपचा पराभव करण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत. काँग्रेसने 26 जाट, 20 ओबीसी, 17 दलित, 11 पंजाबी हिंदू तसेच शीख, 6 ब्राह्मण, 5 मुस्लीम, 2 बनिया व राजपूत, बिश्नोई व रोर समाजातील प्रत्येकी एकाला उमेदवारी दिली आहे. भाजपने 21 ओबीसी, 17 जाट, 11 ब्राह्मण, 11 पंजाबी हिंदू, 5 बनिया व 2 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी

जिकडे सत्ता येण्याची शक्यता असते तिकडे काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद उफाळून येतात, हा आजवरचा इतिहास आहे. हरियाणात देखील पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर होती. भूपेंद्रसिंह हुड्डा, कुमारी शैलजा, रणदीपसिंह सुरजेवाला, उदय भान असे प्रमुख नेते काँग्रेसमध्ये असताना पक्षांतर्गत नाराजीचे ग्रहण काँग्रेसला लागलेले होते. मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी वेळीच नाराजांना बोलावून घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.