जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांना उच्च न्यायालयाचा दणका
पंधरा हजार रुपये दंड व सेवा पुस्तकात नोंद करण्याचे निर्देश
गोंदिया :- जिल्हा परिषद गोंदिया पंचायत समिती देवरी अंतर्गत पशुधन विकास विभागात कार्यरत असताना सेवानिरुत्त सुनील चंद्रशेखर आकांत हे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावर कार्यरत होते.
तर सुनील आकांत श्री समर्थ रामदास शिक्षण संस्था आमगाव या संस्थेचे मानद सचिव म्हणून सन 2009 पासून काम पाहत होते. सुनील आकांत यांनी जिल्हा परिषद गोंदिया कडून सदर धर्मदाय संस्थेत काम करण्यासाठी परवानगी घेतले नसल्याने त्यांनी म. जि. प. जि.से.
(वर्तणूक) मधील नियम (३) च्या भंग केल्याची तक्रार होती. त्यानुसार आकांत यांना पदाचा दुरुपयोग करीत असल्यामुळे म. जि. प. जि.से (शिस्त व अपील) 1964 नुसार त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये?
,याबाबतीत खुलासा सादर करण्याचे कळविण्यात आले. तसेच त्यांना यापुढे श्री समर्थ रामदास शिक्षण संस्था आमगाव या संस्थेत काम करणे बंद करावे असे आदेश देण्यात आले. त्या विरोधात आकांत यांनी रीट पिटिशन २०२०/२०१५ उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल केली. त्यात मुख्य कार्यपालन अधिकारी जि.
प., गोंदिया यांचे आदेश रद्द केले. परंतु यापुढे हा आदेश यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी बनू शकत नाही असेही आदेश दिले. नेमका याच वाक्याचा चुकीचा अर्थ लावून तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. दयानिधी यांनी आकांत यांच्या निवृत्तीवेतनातून पाच टक्के वेतन पाच वर्षापर्यंत कापण्यात यावी. असे आदेश दिले.
त्यामुळे आकांत यांनी व्यतीत होऊन सदर आदेशाविरुद्ध रीट पिटीशन४२४२/२०१९ द्वारे आव्हान दिले. न्यायालयाने १०/ १०/२०२४ सदर याचिकेत यांच्यावर लाभलेली शिक्षा रद्द करून त्यांना सेवानिवृत्ती वेतनातून वसूल केलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले. या आदेशात उल्लेखनीय बाब अशी की प्रतिवादी क्रमांक एक मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया डॉ .दयानिधी यांना दंड म्हणून पंधरा हजार रुपये १८ ऑक्टोंबर पर्यंत रजिस्ट्रार कडे जमा करण्याचे आदेश देत दयानिधी त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयात याचिकाकर्ता सुनील आकांत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील एड.
राम परसोडकर व प्रतिवादी जिल्हा परिषद कडून एड. ए. वाय. कापगते यांनी बाजू मांडली.सदर न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.