Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेच्या 'नगररचना'समोर माजी नगरसेवक झोपले

सांगली महापालिकेच्या 'नगररचना'समोर माजी नगरसेवक झोपले

4  महिन्यांत चाळीस हेलपाटे मारूनही बांधकाम परवाना मिळत नसल्याने संतप्त होत माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेच्या नगररचना कार्यालयाबाहेर आंदोलन केले.



ते कार्यालयासमोर चटई टाकून झोपले. परवाना मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर नगररचना विभागाच्या प्रभारी सहायक संचालक एम. ए. मुल्ला यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. 

हरिदास पाटील म्हणाले, कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्रामागे राहणार्‍या एका नातेवाईकाने घरावरील मजल्याच्या बांधकामासाठी महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. परवान्यासाठी त्यांनी तीस हेलपाटे मारले. खासगी अभियंत्यानेहीही चकरा मारल्या. मी स्वत:ही आठ-दहा वेळा या कार्यालयात येऊन गेलो. तरीही बांधकाम परवाना मिळालेला नाही. अर्जदाराने घर बांधलेले आहे. त्यावेळी बांधकाम परवाना घेतला होता. आता या घरावर मजला बांधण्यासाठी परवानगी मागितली आहे. बांधकाम परवान्यासाठी पूर्वीप्रमाणे कागदपत्रे दिली आहेत. तरीही त्रुटी काढल्या जातात. नगररचना विभागात पैशासाठी अडवणूक होते. त्यामुळे आंदोलन करावे लागले, असे हरिदास पाटील यांनी सांगितले.

अर्जदाराच्या अभियंत्याकडून चुका : मुल्ला

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या प्रभारी सहायक संचालक एम. ए. मुल्ला म्हणाल्या, बांधकाम परवान्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. अर्जदाराने ज्या खासगी अभियंत्याकडून ऑनलाईन अर्ज भरला आहे, त्यात ड्रॉईंगमध्ये चुका केल्या होत्या. त्यांच्या अभियंत्यामुळेच कालावधी लागलेला आहे. महापालिका नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची चूक नाही. ती बाब त्या खासगी अभियंत्याच्या लक्षात आणून दिली आहे. त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.