Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू

भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू


नायजेरियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

५० जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

ही घटना उत्तर नायजेरिया येथील जिगावा राज्यातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकरचा अपघात झाला होता. चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्यात उलटला. यावेळी टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली,यावेळी पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. लोक पेट्रोल गोळा करत होते. यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला. 

मिळालेली माहिती अशी, टँकर उलटल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यातून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
नायजेरियातील बहुतांश अपघात हे खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात, नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची धडक झाली. टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला, यामध्ये किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता.

नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये पेट्रोल टँकर अपघाताची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या अपघातांमध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला तर १,१४२ जण जखमी झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.