श्रीवर्धन - श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे पुण्याच्या पर्यटकांनी ज्योती सुधाकर धामणस्कर वय 34 वर्ष या महिलेला गाडीखाली चिरडले आहे . प्राप्त सूत्रानुसार शनिवारी मध्यरात्री १:३० च्या सुमारास पुणे येथील पर्यटकांनी हरिहरेश्वर येथे धामणस्कर यांच्या इथे राहण्यासाठी रूमची मागणी केली मात्र रूम मालकाने आरोपी दारू पिल्याच्या संशयावरून रूम देण्यास नकार दिला त्यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने धामणस्कर यांना मारहाण केली व हरिहरेश्वर इथून पळ काढला.
मात्र त्यांचा एक सहकारी स्थानिक नागरिकांच्या ताब्यात सापडला स्थानिकांनी सदरच्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्या सहकाऱ्यांना बोलावले. मात्र ताब्यात घेतलेल्या पर्यटकाच्या सहकाऱ्यांनी परत येऊन वाद घातला व ज्योती सुधाकर धामणस्कर या महिलेस गाडी खाली चिरडल्याच्या फिर्याद श्रीवर्धन पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
श्रीवर्धन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १०३ व ३४गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे . एम एच १२ जी एफ ६१०० सफेद रंगाच्या स्कार्पिओ गाडीमध्ये असलेल्या जवळपास दहा व्यक्तींनी सदरची कृत्य केलेले आहे. इराप्पा यमनाप्पा धोत्रे( पिंपरी चिंचवड पुणे ) या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता माने, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लटके पुढील तपास करत आहेत. सदर घटनेचे वृत्त सोशल मीडियामुळे सर्वत्र पसरल्यामुळे श्रीवर्धन मधील नागरिक संतप्त झाले . श्रीवर्धन पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय च्या परिसरात मोठ्या स्वरूपात नागरिकांनी गर्दी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.