बंदी असतानाही वाहतूक सुरू, भरघाव डंपरच्या धडकेने तरुणीचा मृत्यू
पुणे :- सकाळी 7 ते 11 अवजड वाहतुकीला बंदी असताना वाहतूक सुरू ठेवणाऱ्या भरघाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा पती जखमी झाला. ही घटना पुणे नगर महामार्गावर चितळे स्वीट होम समोर सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
१२ दिवसातील हा डंपरचा दुसरा बळी आहे.
सिरीचंदना विश्वनाथ हेवटम ( वय ३२, रा. न्याती ईलान फेज एक, वाघोली, मूळ रा. आंध्रप्रदेश ) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर त्यांचे पती विश्वनाथ हे जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ पती पत्नी व त्यांचे मित्र असे दोन दामत्य सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी बायफ रोड वर गेले होते. तेथून परत येत असताना अपघात होण्याच्या आधी दोन्ही दाम्पत्याने घटना स्थळाच्या अलीकडे नाश्ता केला.
तेथून निघताच पुढे काही अंतरावर विश्वनाथ यांच्या दुचाकीला भरघाव डंपरने धडक दिली. यामध्ये सिरीचंदना या डंपर च्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पुणे नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. या अपघाताच्या धक्याने त्यांचे पती विश्वनाथ यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तर त्यांचे मित्र व पत्नीही स्तब्ध झाले होते.पोलीस आल्यानंतर अर्ध्या तासाने मृतदेह ससून रुग्णालयात हलविले. सकाळीच झालेल्या या अपघाताने बघणारे सर्व जण हेलावून गेले.अपघातानंतर डंपर चालक डंपर सह पळून गेला. २४ सप्टेबर रोजी पुणे नगर महामार्गावर रिलायन्स समोर डंपर च्या धडकेत चैतन्य शिंदे या युवकाचा बळी गेला होता.
सकाळी ७ ते ११ जड वाहतुकीला बंदी
सकाळी सात ते अकरा व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत लोणी कंद वाहतूक विभाग अंतर्गत अवजड वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही रविवारी ११ पूर्वी डंपर ची वाहतूक सुरू होती. याच वाहतुकीचा फटका अपघात झालेल्या तरुणीला बसला. डंपर च्या धडकेने तिला आपला जीव गमवावा लागला. तीन दिवसांपूर्वीच वाहतूक उपायुक्तांनी काढलेल्या आदेशात लोणीकंद वाहतूक विभाग अंतर्गत अवजड वाहनांना बंदी घातली आहे.
डंपर मालकावर गुन्हा दाखल करावा
सकाळी ७ ते ११ अवजड वाहतुकीला बंदी असतानाही डंपर वाहतूक सुरू होती. याच डंपर मुळे तरुणीचा जीव गेला. बंदी असतानाही डंपर रस्त्यावर आणल्याने डंपर मालकावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कल्पेश जाचक यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.