Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने होणार अंत्यसंस्कार; तर राज्यात एक दिवसाचा दुखावटा.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने होणार अंत्यसंस्कार; तर राज्यात एक दिवसाचा दुखावटा.
 
 
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले.
 
मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू असताना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. 
 
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. रतन टाटा यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. अश्यातच आता रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरिन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अत्यसंस्कार केले जातील.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.