Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! 'बीएएमएस'च्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू

धक्कादायक! 'बीएएमएस'च्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू
 

चंद्रपूर : शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खबळळ उडाली आहे.

आचल प्रमोद गोरे (२३) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळचे रहिवासी आहे. आचल ही येथील विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थीनी होती. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. आज, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता तिच्या रूममेटने तिला उठवले.

पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा शासकीय रूग्णालय दाखल केले असता, डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.