Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता ATM कार्ड विसरा... आधार क्रमांकाने काढा कॅश, जाणून घ्या कसे

आता ATM कार्ड विसरा... आधार क्रमांकाने काढा कॅश, जाणून घ्या कसे


सध्याच्या काळात GooglePay, PhonePe, नेटबँकिंगच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जातात. भाजी खरेदीपासून ते मोठ-मोठ्या वस्तू खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटसाठी स्कॅनर चिकटवलेले दिसतात.

हा क्यूआर कोड स्कॅन करुन आर्थिक व्यवहार केले जातात. पण अनेकदा आपल्याला रोकडची गरज भासते. बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. पण आता एटीएममध्ये जाण्याचं टेन्शन विसरा. कारण, तुम्ही आपल्या आधार कार्डद्वारे पैसे काढू शकता. जाणून घेऊयात काय आहे ही प्रक्रिया आणि आधार कार्डच्या माध्यमातून पैसे कसे काढता येतील.

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. पण आता पैसे काढण्याचा एक सोपा मार्ग सुद्धा उपलब्ध झाला आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड क्रमांच्या मदतीने पैसे काढू शकता. ही सेवा मायक्रो-एटीएमवर फंड ट्रान्सफर आणि बॅलन्स तपासण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकते.

NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया युजर्सला AEPS (Aadhaar enabled Payment System) ऑफर करत आहे. ही सेवा युजर्सला आधार कार्ड क्रमांक आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून बँकिंग संबंधित कामे करण्यास परवानगी देते. याच्या माध्यमातून बँकेतून पैसे काढणे, बॅलन्स इन्कायरी, मायक्रो एटीएमवर फंड ट्रान्सफर करता येऊ शकते.


आधार कार्डच्या माध्यमातून असे काढा पैसे

आधार कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटसोबत जोडलेला असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमचा आधार क्रमांक आणि बँक अकाऊंड एकमेकांसोबत जोडलेले असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.


AEPS सपोर्ट करणाऱ्या बँकिंग एजंट किंवा मायक्रो-एटीएमला भेट द्या. हे सहसा ग्रामीण भागात, बँकिंग आऊयलेट्स किंवा मोबाईल बँकिंग सेवामध्ये आढळतात.
मायक्रो एटीएममध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा.
यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनरच्या मदतीने बायोमेट्रिक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा. ऑथेंटिकेशन यशस्वी करण्यासाठी तुमचा डेटा आधार कार्डसोबत मॅच झाला पाहिजे.
ऑथेंटिकेशन झाल्यावर सिस्टममध्ये तुम्हाला विविध ऑप्शन्स दिसतील. यापैकी 'Cash Withdrawal' हा ऑप्शन निवडा.
मग तुम्हाला जितकी रक्कम काढायची आहे ती रक्कम टाईप करा.
यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या बँक अकाऊंटमधून पैसे डेबिट होतील. लक्षात ठेवा की, तुम्ही जी रक्कम टाईप करत आहात ती विड्रॉवल लिमिटच्या आत असावी.
ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर बँकिंग एजंट तुम्हाला रोख रक्कम देईल.
यासोबतच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्याचा एसएमएस सुद्धा येईल.
या गोष्टींची घ्या काळजी

तुमचा आधार नंबर केवळ अधिकृत बँकिंग सर्व्हिसेसाठीच जाहीर करा.
ट्रान्झॅक्शन अलर्टसाठी आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर अपडेट ठेवा.
तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनमध्ये वापरलेले फिंगरप्रिंट स्कॅनर सुरक्षित आहे की नाही हे तपासा.
जवळपास सर्वच मोठ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक बँका AEPS सेवा देतात. त्यांची उपलब्धता ही बँकेच्या ब्रान्च आणि क्षेत्र यावर अवलंबून असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.