Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फुफ्फुसाचा कर्करोग 5 सेकंदात कसं ओळखाल, घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

फुफ्फुसाचा कर्करोग 5 सेकंदात कसं ओळखाल, घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट
 
 
फुफ्फुसांचा कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. द लँसेटच्या रिपोर्टनुसार, 2020मध्ये, 2,206,771 नवीन रुग्णांना कर्करोगाच्या रुग्णांचे निदान झाल्याचे समोर आले आहे. हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. इतकेच नाही तर कॅन्सरशी संबंधित मृत्यूचे प्रमाण हे 1,796,144 आहेत. या कर्करोगामुळं होणाऱ्या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे निदान उशिराने होणे. व वेळेत उपचार होत नाहीत.

फुफ्फुसाच्या कर्करोगावर वेळीच उपचार केल्यास धोका टाळू शकतो. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर लगेचच उपचार सुरू करा. लक्षणे ओळखणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला एक डायमंड फिंगर टेस्ट करणे गरजेचे आहे. या एका टेस्टमुळं तुम्ही कर्करोगाची लक्षणे ओळखू शकता. ही टेस्ट इतकी सोप्पी आहे की तुम्ही घरीदेखील करु शकता.

काय आहे डायमंड फिंगर टेस्ट?
या टेस्टमध्ये तुम्हाला अंगठा आणि तर्जनी समोरा समोर आणा एकमेकांना चिटकवण्याचा प्रयत्न करा. जर तर्जनी आणि अंगठा एकमेकांमध्ये थोडे जरी अंतर उरले नाही तर याला फिंगर क्लबिंगचा संकेत आहे. जे फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची शक्यता दर्शवतात. कॅन्सर रिसर्च युकेनुसार, नॉन स्मॉल सेल लंग कँन्सरअसलेल्या 35 टक्केहून अधिक व्यक्तींमध्ये अशी स्थिती पाहायला मिळाली आहे. क्लबिंग फुफ्फुस, हृदय किंवा पाचनतंत्राशी संबंधित संकेत दर्शवतात.

फुफ्फुसांच्या कर्करोगांचे लक्षणांमध्ये 3 आठवड्याहून अधिक वेळापर्यंत खोकला, छातीत संसर्ग, खोकल्यातून रक्त पडणे, श्सास लागणे आणि भूक न लागणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, चेहरा आणि मानेवर सूज आणि गिळण्यास त्रास हे संकेतदेखील असू शकतात.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची कारणे आणि उपाय

फुफ्फुसाच्या कर्करोगाची मुख्य कारणे धुम्रपान, प्रदूषण, एस्बेस्टस आणि रेडॉनच्या संपर्कात येणे. फॅमिली हिस्ट्री, एचआयव्हीदेखील या रोगास कारणीभूत ठरतात.

काय काळजी घ्याल?

फुफ्फुसांच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी धुम्रपान करु नका. त्या व्यतिरिक्त आवळा, संत्र, पीच आणि गाजर यांसारखे पदार्थ फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता कमी करू शकतात. तसेच, प्रदूषणाच्या काळात फेस मास्क घालणे देखील फायदेशीर ठरू शकते.

(सूचना : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.  'सांगली दर्पण 'याची पुष्टी करत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.