Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

500 च्या नोटांवर अनुपम खेरचे Photo का छापले? आरोपीने दिलं असं उत्तर, डोक्याला हात लावाल!

500 च्या नोटांवर अनुपम खेरचे Photo का छापले? आरोपीने दिलं असं उत्तर, डोक्याला हात लावाल!

अहमदाबाद : 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींऐवजी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो लावून सराफा व्यापाऱ्याला लुबाडण्यात आलं होतं. नकली नोटा देऊन आरोपींनी अहमदाबादच्या सराफा व्यापाऱ्याला 1.6 कोटी रुपयांचा गंडा घातला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे, तर आणखी 4 संशयीतांचा शोध सुरू आहे.

मेहुल बुलियनचे मालक मेहुल ठक्कर यांच्या तक्रारीवरून 24 सप्टेंबरला नवरंगपुरा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अहमदाबाद क्राईम ब्रांचने दीपक राजपूत (वय 32) , नरेंद्र यादव उर्फ नंदू (वय 36) आणि कल्पेश मेहता (वय 45) या तिघांना अटक केली आहे. हे तिघंही अहमदाबादमध्येच राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहुल ठक्कर यांना काही जणांनी आपल्याला 2,100 ग्राम (2.1 किलो) सोनं विकत घ्यायचं आहे, असं सांगितलं. तसंच 24 सप्टेंबरला नवरंगपुराच्या सीजी रोडवर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कुरिअर फर्ममध्ये या सोन्याची डिलिव्हरी करा, असंही मेहुल ठक्कर यांना सांगण्यात आलं.

अनुपम खेरचा फोटो का वापरला?


500 रुपयांच्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का लावला? याबाबत आरोपींनी पोलीस तपासात माहिती दिली आहे. राजपूतला नकली नोटा आणि खेळातल्या नोटांमधला फरक माहिती होता. नकली नोटा छापल्या तर कठोर शिक्षा होईल हे आरोपीला माहिती होतं, त्यामुळे या शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीने नकली नोटांवर नकली फोटोचा वापर केला.

मेहुल ठक्कर यांनी भरत जोशी यांच्यासह आपल्या कर्मचाऱ्यांना 1.6 कोटी रुपयांचं सोनं घेऊन कुरिअर कंपनीमध्ये पाठवलं. या कुरिअर कंपनीमध्ये दोन जण उपस्थित होते. या दोघांकडे कर्मचाऱ्यांनी सोनं दिलं. याबदल्यात आरोपींनी जोशींना 500 रुपयांची 26 बंडल दिली, ज्याचं मूल्य 1.3 कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपींनी जोशीला मशिनचा उपयोग करून पैसे मोजायला सांगितले आणि 30 लाख नंतर देतो, असंही आश्वासन दिलं. यानंतर आरोपी सोनं घेऊन पसार झाले.



जोशींनी जेव्हा पैसे मोजायला सुरूवात केली तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण नोटांवर महात्मा गांधींऐवजी अनुपम खेरचे फोटो होते. याप्रकरणाचा मास्टरमाईंट राजपूत याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. राजपूतच सोनं विकत घेण्यासाठी मेहुल ठक्कर यांच्या दुकानात शीख व्यापारी बनून गेला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.