नवेखेड : उसाला प्रतिटन ४ हजार दर देता येतो. कोणत्याही कारखानदारांने हे खोटं आहे हे सिद्ध केल्यास पाच तोळे सोने, एक लाख रुपये, एक कार व त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल, असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनेकवेळा ऊस दरासाठी आंदोलने केली. काही वेळा यश आले. काही वेळा आले नाही तरीही लढण्याचे एक लोक थांबवत नाहीत. गळीत हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा डोके वर काढणार आहे. अलीकडील १०-१५ वर्षांत बियाणे मजुरी पाणीपट्टी, रासायनिक खतांचे दर वारेमाप वाढले. त्यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च वाढला. पर्यायाने ऊस दर म्हणावा तसा वाढला नाही. एकरी ऊस उत्पादनाचा लागणीपासून तोडणीपर्यंतचा खर्च एकरी ८० हजार ते लाखापर्यंत गेला आहे. कारखाने ३००० ते ३२०० दर देत आहेतय हा दर उत्पादकांना न परवडणारा आहे. साखरेचा खुल्या बाजारातील दर वाढलेला असतो. उपपदार्थ निमिर्तीमधून ही चांगला फायदा होतो. तरीही वाढीव दर देताना कारखानदार एक होतात. प्रत्येकजण १०-२० आणि ५० रुपयांच्या फरकात दर देऊन उत्पादकांना फसवतात. जो कारखाना टनाला ४ हजार हजार रुपये दर देईल. त्या कारखानदारांना ५ तोळे सोने, एक चारचाकी, रोख १ लाख व हत्तीवरून मिरवणूक काढू.
-दिलीप पवार, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. टनाला ३ हजार ते ३२०० दर न परवडणारा आहे. 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांचे हे आव्हान कारखानदारांनी स्वीकारावे.
-भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
जमा प्रति टन
एक टनापासून १२५ किलो साखर निर्मिती १२५ ×३७ = ४६२५
एक टन उसातून ४० किलो मळी तयार होते ४० किलो मळीतून १० लिटर स्पिरिट होते. २५ लिटर मद्य तयार होते. २५ × २०० = ५०००
इथेनॉल(बी हेवी) एक टक्का रिकव्हरीमधुन ९ लिटर इथेनॉल तयार होते. ते तयार करण्यासाठी खर्च फक्त ७२ रुपये येतो. खर्च वजा जाता ४७४.२५ रुपये मिळतात.
बगॅस प्रति टनास ७० किलो.
दर २ रुपये = १४० रुपये कोजन टनास १२५ रुपये २६५ मिळतात.
एकूण जमा रक्कम १०३६४.७५
खर्च असा प्रति टन
तोडणी खर्च ७५०
प्रक्रिया खर्च नोकर पगार, अबकारी निधी व्हॅट भरणा ५००
कारखान्याच्या कर्जावरील व्याज २००.
असा एकूण खर्च १४५०
एकूण उत्पादन १० हजार ३६४.७५ - एकूण खर्च १ हजार ४५०. म्हणजे मिळणारी रक्कम ८९१४.७५. आणखी ५० टक्के सोडली तर ४ हजार ५०० असा दर देऊ शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.