Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायमूर्तींनी लंडनमध्ये 400 कोटींचा व्हिला खरेदी केला:त्या बदल्यात महाराष्ट्राचे सरकार वाचवले; खुलासा करण्याचा संजय राऊतांचा इशारा

न्यायमूर्तींनी लंडनमध्ये 400 कोटींचा व्हिला खरेदी केला:त्या बदल्यात महाराष्ट्राचे सरकार वाचवले; खुलासा करण्याचा संजय राऊतांचा इशारा


मुंबई-महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर दबाव होता असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही तर एका न्यायमूर्तींनी आणि त्यांच्या कुंटुंबाने लंडनमध्ये 300 ते 400 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे.

आणि त्यासाठी कोणाच्या पैशांचा वापर झाला हे मी लवकरच जाहीर करणार असल्याचा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयावरती कमालीचा दबाव आणि इतर अनेक गोष्टी असू शकतात. निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी आमदार अपात्रेसंदर्भात न्यायालय निर्णय घेणार नसेल तर, हे घटनाबाह्य सरकारला न्यायालयाने समर्थन असल्याचे दिसून येते. घटनाबाह्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चालू देतात आणि आम्हाला तारखांवर तारखा देतात. त्यामुळे या देशाचा सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास उडून गेला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या सर्व काळामध्ये कोणत्या न्यायाधीशाने आणि त्याच्या कुटुंबियांनी लंडनमध्ये 300 ते 400 कोटी रुपयांचा व्हिला खरेदी केला आहे. आणि तो कोणाच्या पैशाने खरेदी केला आहे आणि त्या बदल्यात महाराष्ट्रातील सरकार कसे वाचवण्यात आले, हे मी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.

या संदर्भात आपण लवकरच माहिती देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हे सरकार वाचवायला या मागे फार मोठे कारस्थान आणि षड्यंत्र होते, असा आरोप देखील राऊत यांना केला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी हजारो कोटी रुपये अडीच वर्षात खर्च झाले आहेत. आमची न्याय यंत्रणा संविधानाचे रक्षण करण्यामध्ये अपुरी पडली, असे दुर्दैवाने म्हणावे लागत असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.