वाळवंटात फुलवली सफरचंदाची शेती; 'ही' महिला शेतकरी करतीये वर्षाला 40 लाखांची कमाई!
शेती हा आजकाल अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जण आपली नोकरी सोडून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि
शिक्षणाच्या जोरावर त्यांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. यात काही
महिला शेतकरी देखील मागे नसल्याचे दिसून येत आहे. आज आपण अशाच एका महिला
शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतले
असून, त्या शेतीमधून लाखोंची कमाई करत आहे.
वाळवंटात सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी
संतोष
देवी असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या राजस्थानमधील सीकर येथील
रहिवासी आहेत. सफरचंदाची शेती म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नाव उभे राहते
ते जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश या राज्यांचे… मात्र, संतोष देवी यांनी
आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राजस्थानसारख्या वाळवंटी भागात देखील
सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
(फोटो सौजन्य - सोशल मीडीया)
शेतीसोबत करतात रोपवाटिका व्यवसाय
संतोष देवी राजस्थानातील आपल्या सीकर या जिल्ह्यात सफरचंदाची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात सफरचंदाची एकूण १०० झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे त्या सेंद्रिय शेती करतात. प्रत्येक झाडापासून त्यांना दरवर्षी 80 किलो सफरचंद मिळतात. संतोष देवी शेतीसोबतच रोपवाटिका व्यवसायही करतात. संतोष देवी फळांची शेती आणि रोपवाटिका यातून वर्षाला सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्या सांगतात.
इतर फळांचीही करतात लागवड
संतोष देवी यांच्याकडे एकूण 220 डाळिंबाची झाडे आहेत. प्रत्येक झाडापासून त्यांना वर्षाला सुमारे 60 किलो डाळिंब मिळतात. याशिवाय त्या सेंद्रिय पद्धतीने किन्नू, लिंबू आणि सपोटा हे देखील फळपीके घेतात. डाळींबाला 200 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. वनस्पती रोपवाटिकांमधूनही ती चांगली कमाई करते. यामध्ये केशर, आंबा, सपोटा, सफरचंद, पेरू, डाळिंब आणि लिंबू या झाडांच्या रोपांचा समावेश आहे. नर्सरीतून त्यांना वर्षाला अंदाजे २५ लाख रुपये कमाई मिळते. याशिवाय त्यांना अन्य फळपिकांमधून देखील मोठी कमाई मिळते.
किती होते वार्षिक कमाई?
संतोष देवी या आपल्या शेतात पिकणाऱ्या सफरचंदाला 150 ते 200 रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. विशेष म्हणजे खरेदीदार सेंद्रिय सफरचंदाची खरेदी करण्यासाठी त्यांच्या शेखावटी कृषी फार्म आणि रोपवाटिकेला भेट देतात. या सफरचंदांची चव इतर प्रकारच्या सफरचंदांपेक्षा गोड असल्याचे ती सांगते. फळ विक्री आणि रोपवाटिका यातून त्या वर्षाला सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.