Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जे. जे.हॉस्पिटल शूटआऊट, 32 वर्षांनंतर फरार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

जे. जे.हॉस्पिटल शूटआऊट, 32 वर्षांनंतर फरार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात
 

जे . जे. शूटआऊट प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर ही कारवाई केली असून पोलिसांनी यूपीतल्या कारागृहातून त्रिभुवन सिंह ऊर्फ प्रधान उैर्फ श्रीपती श्रीकांत (62)या शूटरचा ताबा घेऊन त्याला मुंबईत आणले.

12 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. इस्पितळात रात्रीच्या वेळी दाऊदने त्याच्या शूटर्सकरवी गोळीबार घडवून आणला होता. अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपीन शेरे हे दोघे जे. जे. इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्यावर दाऊदने हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी शूटर्सनी या दोघांच्या संरक्षणसाठी तैनात असलेल्या दोघा पोलिसांवर एके 47 रायफलमधून गोळय़ा झाडल्या. त्यानंतर बिपीन आणि शैलेशवर गोळीबार केला होता. त्यात बिपीन वगळता दोन पोलीस आणि शैलेश जागीच मारले गेले, तर गंभीर जखमी झालेला बिपीन नंतर उपचारादरम्यान मृत पावला होता. या हल्ल्यात सहभागी असलेला त्रिभुवन सिंह हा यूपीत जाऊन लपला होता. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला पकडल्याने तो तेथील अन्य गुह्यांत कारागृहात होता. त्याचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलीस सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्रिभुवनचा ताबा घेऊन त्याला मुंबईत आणले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.