Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताची जनगणना पुढच्या वर्षी होणार, अधिकारी तुम्हाला 'हे' 30 प्रश्न विचारणार

भारताची जनगणना पुढच्या वर्षी होणार, अधिकारी तुम्हाला 'हे' 30 प्रश्न विचारणार
 

भारतात पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये जनगणना होण्याची शक्यता आहे. 2011 पासून देशात जनगणना झालेली नाही. यंदा होणारी जनगणना खूप वेगळी असू शकते.  ही जनगणना पेपरलेस असेल म्हणजेच जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे काम 2025 च्या सुरुवातीच्या महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 2011 मध्ये भारताची जनगणना झाली होती. त्यावेळी एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले होते. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. पण 2021 मध्ये कोरोनामुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लोकसभा निवडणुका असल्याने आणखी विलंब झाला. पण आता 2025 च्या सुरुवातीला जनगणना सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच आता यंदाच्या जनगणनेत नागरिकांना 30 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

2025 च्या सुरुवातीला जनगणना सुरू होण्याची शक्यता आहे. तर या जनगणनेची आकडेवारी 2026 पर्यंत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यावर भविष्यातील जनगणना चक्र पूर्णपणे बदलेल. लोकसभेच्या जागांची पुनर्रचना गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. जनगणनेनंतर लोकसभा मतदारसंघांची जागा वाढणार असून महिला आरक्षणही लागू होणार आहे.

सर्वसाधारण जनगणनेसोबत जातनिहाय जनगणना होणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये. 1951 पासून देशाची लोकसंख्या दर 10 वर्षांनी मोजली जाते. पण कोविड -19 महामारीमुळे 2021 मध्ये जनगणना होऊ शकली नाही. आता जनगणनेच्या पुढील कार्यक्रमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

जगणनेच्या दरम्यान विचारले जाऊ शकतात हे 30 प्रश्न

व्यक्तीचे नाव
कुटुंबाच्या प्रमुखाशी संबंध
लिंग
जन्मतारीख आणि वय
वैवाहिक स्थिती
धर्म
पंथ
अनुकूचित जाती किंवा जमाती
अपंगत्व
मातृभाषा
इतर कोणत्या भाषांचे ज्ञान आहे?
साक्षरतेची स्थिती
सद्य स्थितीत शैक्षणिक स्थिती
उच्च शिक्षण
गेल्या वर्षीचा रोजगार
आर्थिक श्रेणी
रोजगार
उद्योग, रोजगार आणि सेवांचे स्वरूप
कामगार वर्ग
गैर-आर्थिक स्थिती
कोणत्या रोजगाराची इच्छा
कामावर जाण्याचे माध्यम
एका ठिकाणाहून दुसरीकडे
प्रवासाचे माध्यम
मूळ ठिकाणी जन्म झाला की इतरत्र? दुसऱ्या देशात झाला असेल तर त्याचे नाव
मूळ ठिकाणी राहतात की स्थलांतरित आहात?
केवळ भारतातच स्थलांतर केले होते का?
स्थलांतर कधी केले?
मूळ ठिकाणाहून स्थलांतराचे कारण
तुम्हाला मुले किती?
किती मुली 

जन्माला आलेली किती मुलं जिवित
किती मुले
किती मुली
गेल्या एका वर्षात जन्मलेल्या मुलांची संख्या
नवीन ठिकाणी स्थळांतर होऊन किती वर्षे झाली
स्थलांतरापूर्वीचे मूळ ठिकाण

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.