2 जागा, एक कॅबिनेट मंत्रिपद, ४ महामंडळ अध्यक्षपद; महायुतीकडून रामदास आठवलेंची नाराजी दूर?
मुंबई : महायुतीच्या जागावाटपात रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाने २१ जागांची मागणी केली होती. महायुतीच्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपात आठवले यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती.
त्यामुळे आठवले गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून नाराजी व्यक्त केली. त्यांनत आज सोमवारी आठवले गटाला महायुतीला दोन जागा सुटल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील धारावी आणि कलिना विधानसभा मतदारसंघ आरपीआय पक्षाला मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून आठवलेंना आश्वासन
रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईतील धारावी आणि कलिना हे दोन मतदारसंघ देण्यात आले आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व, राज्यात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे आणि महामंडळ संचालक पदे, जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्यपदे, महापालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रिपब्लिक पक्षाला जागा देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
रामदास आठवलेंची नाराजी दूर?
देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला सारून नव्या दमाने महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआयला मुंबईतील दोन जागा
दरम्यान, रिपब्लिकन पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून धारावी मतदारसंघ आणि भाजपच्या कोट्यातून कलिना हे मुंबईतील दोन मतदारसंघ सोडण्यात आले आहेत. या बाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. सत्ता आल्यास महायुती सत्तेत वाटा देऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आठवलेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.