तोंडातील फोड आणि हिरड्यांची समस्या झटक्यात होईल दूर, 2 रूपयांच्या तुरटीचा 'असा' करा वापर!
तोंडाला येणारे फोड ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येचा त्रास खूप जास्त होतो. तोंडात फोड आले तर काही खाणं-पिणं अवघड होऊन बसतं. अशात वेगवेगळी औषधं घेतली जातात.
पण औषधांऐवजी ही समस्या एका नॅचरल उपायाने दूर करता येते. तो उपाय म्हणजे तुरटी. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रोबिन शर्मा यांच्यानुसार, तुरटीचा वापर 4 वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशात यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तोंडातील फोड
तोंडाला आलेले फोड अनेक दिवस त्रास देतात. जोपर्यंत हे फोड असतात तोपर्यंत तुम्ही योग्यपणे खाऊही शकत नाही आणि काही पिऊही शकत नाही. जर तोंडात फोड झाले असतील तर तुरटीच्या पाण्याने दोन ते तीन वेळ गुरळा करा. दोन दिवसात आराम मिळेल.
हिरड्यांची समस्या
डॉक्टरांनुसार, अनेकदा लोकांमध्ये हिरड्यांची कमजोरी, हिरड्यांमधून पस येणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या बघायला मिळतात. या समस्या तुम्ही केवळ 2 रूपयांच्या तुरटीने दूर करू शकता. यासाठी तुरटीचं पावडर तव्यावर टाकून जाळा. या पावडरने बोटांच्या मदतीने हिरड्यांवर घासा. दोन दिवसात तुम्हाला फरक दिसेल.
त्वचेची समस्या
खाज, फोड, पुरळ अशा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. तुरटी आंघोळ करताना शरीरावर घासू शकता. याने तुमच्या त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतील. सोबतच घामाची दुर्गंधी येणंही बंद होईल. तसेच सुरकुत्याही दूर होतील.
तळपायांवर डाग
तळपायांवर मृत पेशी, डाग असतील तर तेही तुरटीच्या पाण्याने दूर करण्यास मदत मिळते. तुरटीच्या पाण्याचं मिश्रण तयार करा आणि पायांवर लावा. याने पायांवरील मृत पेशी, जखमा बऱ्या होतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.