Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती! जिंकले 25 कोटी, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?

मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती! जिंकले 25 कोटी, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?
 

कर्नाटकातील एका स्कूटर मेकॅनिकचे नशीब गुरुवारी चमकले आहे. मंड्याचा रहिवासी मेकॅनिक अल्ताफने एका रात्रीत आपले 25 कोटी रुपयांची केरळ तिरुवोनम बंपर लॉटरी जिंकली. सध्या ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एका सामान्य व्यक्तीचे असे रातोरात करोडपती होणे काही साधी बाब नाही. अल्ताफने ही लॉटरी काही मिळवली ते या लेखातून जाणून घेऊयात. अल्ताफने सांगितले की, "मी सुमारे 15 वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होतो. "शेवटी मी जिंकलो." त्याच्या लॉटरीच्या तिकिटाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तो सध्या वायनाडमध्ये आहे. त्याचे म्हणणे आहे की, तो त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटण्यासाठी वायनाडला येतो. लॉटरी विजेता अल्ताफ म्हणाला, "जेव्हा मी वायनाडला माझ्या मित्राला भेटायला यायचे, तेव्हा मी लॉटरीची तिकिटे खरेदी करायचो."

तिरुअनंतपुरममधील गॉर्की भवन येथे बुधवारी (9 ऑक्टोबर) झालेल्या ड्रॉमध्ये TG 43422 चा विजेता क्रमांक निवडला गेला, ज्याची विक्री वायनाड येथील पनारामम येथील SJ लकी सेंटरने केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या लॉटरीच्या तिकिटातील बंपर बक्षीस राज्याबाहेरील व्यक्तीने जिंकले होते. तमिळनाडूतील तिरुपूर येथील चार संयुक्त विजेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला. लॉटरी विजेत्याने सांगितले की जिंकल्यानंतर, सर्व कर वजा करून सुमारे 13 कोटी रुपये त्यांना देण्यात आले.

अल्ताफने सांगितले की, त्याला 18 वर्षांची मुलगी आहे आणि तिला डॉक्टर बनायचे आहे. जेव्हापासून अल्ताफचा लॉटरी जिंकली तेव्हापासून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पैशाच्या मदतीने तो आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे अल्ताफने सांगितले. अल्ताफ सध्या भाड्याच्या घरात राहतो आणि आता त्याला त्याच्या कुटुंबासाठी स्वतःचे घर विकत घेऊन त्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

लॉटरी विजेत्या अल्ताफने सांगितले की, जेव्हा लॉटरीची तिकिटे जाहीर झाली तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राला प्रत्येकी 500 रुपयांची दोन तिकिटे खरेदी करण्यास सांगितले, परंतु अल्ताफ त्याच्या मित्राला एक तिकीट देणार होता. मात्र त्याच्या पत्नीने त्याला असे करण्यास नकार दिला आणि आज त्याच तिकिटाने त्याला रातोरात करोडपती बनवले आहे.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.