Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू वाईटच! काहींना दिसणं बंद झालं, श्वास कोंडला, एकापाठोपाठ 24 जणांनी जग सोडलं

दारू वाईटच! काहींना दिसणं बंद झालं, श्वास कोंडला, एकापाठोपाठ 24 जणांनी जग सोडलं

सिवान: देशाच्या काही राज्यांमध्ये दारूबंदी आहे. अशा राज्यांमध्ये बिहारचाही समावेश होतो; मात्र दारूबंदी असूनही बिहारमध्ये सध्या दारूमुळे खळबळ उडाली आहे. सिवान आणि छपरा इथल्या वेगवेगळ्या गावात 24 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्वांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. हे सर्व जण घटनेच्या दोन दिवस आधी दारू प्यायले होते. 12हून अधिक जण आजारी आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी दोन जणांची दृष्टी गेली आहे. अवैध दारू प्यायल्याने 20 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला सिवानच्या एसपींनीदेखील दुजोरा दिला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संशयास्पद मृत्यूची प्रकरणं मंगळवार-बुधवारी उघडकीस आली. सिवानच्या सीमेला लागून असलेल्या सारण जिल्ह्यातल्या मशरक पोलीस स्टेशन हद्दीतल्या इब्राहिमपूर गावात दोन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात अशाच प्रकारच्या अनेक मृत्यूंची नोंद झाली.

घटनेनंतर महाराजगंजचे एसडीपीओ घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सारण जिल्ह्यातील मशरखमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या एक दिवस अगोदर या परिसरात फिश पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत मद्यपानही झालं होतं. दारू प्यायल्यानंतर अनेकांची तब्येत बिघडली.

बिहारमध्ये 2016पासून दारूबंदी आहे. तरीदेखील तिथे विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. सध्या उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, तीन आरोपींना अटक केली आहे.

मंगळवारी आणि बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर सिवानच्या एसपींनी एका पोलीस स्टेशनच्या प्रभारींना वॉर्निंग दिली आहे, तर दोन पोलीस स्टेशन प्रभारींना निलंबित केलं आहे. सिवान पोलिसांनी एक हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला असून, लोकांना अशा प्रकरणांची माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.