2,43,93,60,00,000 Rs. अंबानींच्या अँटीलिया पेक्षा महागडं घर गुजरातमध्ये, इथं राणी सारख्या राहतात राधिका राजे गायकवाड
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर असलेले अँटीलिया हे जगभरातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. 4,00,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं हे घर म्हणजे 27 मजली अलिशान इमारत
आहे. अँटीलिया हाऊसची किंमत जवळपास 15 हजार कोटी रुपये इतके आहे. अँटीलिया
पेक्षा भव्य दिव्य असे जगातील सर्वात मोठं घर गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील
लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा
आहे. या घरात राधिका राजे गायकवाड या राणीसारख्या राहतात.
लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खासगी घर आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे लंडनमधील बकिंघम पॅलेसपेक्षा चार पट मोठे आहे. या पॅलेसची भव्यता पाहून सगळे चाट पडतात. जितका हा पॅलेस भव्य आहे तितकाच तो अलिशान देखील आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे बडोदाचे राज घराने गायकवाड कुटुंबाचे निवासस्थान आहे.लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये सर्वसामान्यांदेखील प्रवेश दिला जातो. कारण पॅलेसच्या एका भागात गायकवाड राजघराने राहते. तर दुसरा भाग सामान्य जनतेसाठी खुला केला आहे. सर्वसामान्य लोक येथे जाऊन राजमहल पाहू शकतात. गायकवाड कुटुंबाने या भागात महाराज फतेह सिंह संग्रहालय देखील सुरु केले आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी सन 1890 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस बांधला होता. सध्या महाराज समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी महारानी राधिका राजे गायकवाड यांचे कुटुंब या पॅलेसमध्ये राहत आहे. मराठा साम्राज्याच्या वैभव कसे होते याची झलक या राजवाड्यात पहायाल मिळते. एकेकाळी गायकवाड कुटुंबाने बडोदावर राज्य केले होते. या पॅलेसची मालकी समरजीत सिंह गायकवाड यांच्याकडे आहे. समरजीत सिंह यांच्या कुटुंबियांची संपत्ती २० हजार कोटींच्या आसपास आहे. 2002 साली त्यांचा विवाह राजकुमारी राधिकाराजे यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.
भव्य दिव्य पॅलेस
3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस विस्तारलेला आहे. जगातील सर्वात महागडे घर असलेल्या ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसही याच्यापेक्षा आकारेने लहान आहे. बकिंगहॅम पॅलेसचा विस्तार हा केवळ 8,28,821 स्क्वेअर फूट इतका आहे. तर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे आलिशान घर आहे. मात्र, अँटेलिया हाऊस देखील फक्त 48,780 स्क्वेअर फूट आकाराचे आहे. लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. याची किंमत 2,43,93,60,00,000 म्हणजेच जवळपास 25 हजार कोटी इतकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.