Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

200च्या नोटा बंद होणार? सरकारने जमा करुन घेतल्या 137 कोटी मुल्याच्या नोटा, जाणून घ्या प्रकरण

200च्या नोटा बंद होणार? सरकारने जमा करुन घेतल्या 137 कोटी मुल्याच्या नोटा, जाणून घ्या प्रकरण
 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने अलीकडेच बाजारातून दोन हजार रुपयांची नोट काढून चलनातून बाहेर काढली आहे. सर्व 2,000 रुपयांच्या नोटा परत येताच 200 रुपयांच्या नोटाही काढल्या जाऊ लागल्या. रिझर्व्ह बँकेने सुमारे 137 कोटी रुपयांच्या 200 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेतल्याचे वृत्त आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या 6 महिन्यांत हे केलंय. अशा परिस्थितीत 200 रुपयांच्या नोटेवर हे संकट का निर्माण झाले, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.

अहो, काळजी करू नका. रिझव्र्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटेचे चलन रद्द केलेले नाही किंवा तसा कोणताही हेतू नाही. खरंतर, बाजारातून नोटा परत मागवण्याचे कारण म्हणजे या नोटांची खराब स्थिती. रिझर्व्ह बँकेने आपल्या 137 अहवालात म्हटले आहे की, यावेळी सर्वाधिक दोष 200 रुपयांच्या नोटेवर दिसले. या कारणामुळे बाजारातून 137 कोटी रुपयांच्या नोटा परत मागवाव्या लागल्या. यातील काही नोटा कुजलेल्या अवस्थेत होत्या तर काही नोटांवर लिहिल्यामुळे चलनातून बाहेर काढाव्या लागल्या होत्या.

गेल्या वर्षी 135 कोटी केल्या होत्या जमा 

गेल्या वर्षीही रिझर्व्ह बँकेने 135 कोटी रुपयांच्या 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तेव्हाही या नोटा घाणेरड्या, फाटलेल्या आणि कुजलेल्या होत्या, हेच त्याचे कारण होते. मात्र, मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर खराब झालेल्या नोटांची संख्या सर्वाधिक 500 रुपयांची आहे. 2000रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांचा वापर वाढल्याचे बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच यावेळी 200 रुपयांचे चलन मोठ्या प्रमाणात खराब होऊन ते परत मागवण्यात आले.

500 रुपयांच्या नोटांवर सर्वाधिक किंमत
 
रिझर्व्ह बँकेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सर्वाधिक नुकसान झालेल्या 500 रुपयांच्या नोटा आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बाजारातून 500 रुपयांच्या सुमारे 633 कोटी रुपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या होत्या. या नोटा खराब झाल्यामुळे किंवा फाटल्या गेल्यामुळे परत घेण्यात आल्या. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीवर नजर टाकली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 रुपयांच्या नोटांची संख्या केवळ 50 टक्के दिसून आली, तर 200 रुपयांच्या नोटांची संख्या 110 टक्क्यांवर पोहोचली आहे.

अगदी छोट्या नोटांवरही मोठी कारवाई 

रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टनुसार म्हटले आहे की, खराब झालेल्या नोटांमध्ये केवळ मोठ्या चलनाचा समावेश नाही, तर छोट्या नोटांची संख्याही खूप मोठी आहे. 5 रुपयांच्या केवळ 3.7 कोटी नोटा काढण्यात आल्या आणि 234 कोटी रुपयांच्या 10 रुपयांच्या नोटा काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे 20 रुपयांच्या 139 कोटी रुपयांच्या, 50 रुपयांच्या 190 कोटी रुपयांच्या आणि 100 रुपयांच्या 602 कोटी रुपयांच्या नोटा बाजारातून परत मागवण्यात आल्या आहेत.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.