2 लहान लेकींना मारलं अन् मृतदेह नदीत फेकले, बापाच्या सैतानी कृत्यानं अकोला हादरलं!
अकोला : अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या दोन लहान मुलींचा खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याची घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, या सैतानी बापानेच मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून वाहणाऱ्या भिकुंड नदीत ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मदाता पिता आणि मुली हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. या घटनेनंतर बापाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शेख हरून शेख शब्बीर असं बापाचं नाव आहे. कुमारी सदफ आणि कुमारी आलिया असं दोन्ही मुलींचं नाव आहे. पोलिसांनी या सैतानी बापाला अटक केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखविताच दोन्ही मुलीचा खून करून बाळापूर जवळील नदीत मृतदेह फेकल्याची शेख हरूनने कबुल केलं आहे.
धक्कादायक म्हणजे, कदमापूर इथं राहणाऱ्या शेख हरून शेख शब्बीर याने आज दुपारीच दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन दिली होती. दरम्यान, सदर दोन्ही मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसून दिले होते असं सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी शेख हरून यांच्यावर संशय आला. पोलिसानी हरूनची कसून चौकशी केली असता आपल्या मुलींचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
त्याने दाखविलेल्या बाळापूर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृत्यू शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण, हिवरखेड आणि अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पण, त्याने हे कृत्य का केलं, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या मुलींचा शोधकार्य सुरू आहे. अजूनही मृतदेह मिळून आले नसून शेख हरून मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.