खेड शिवापूर टोल नाक्यावर शिंदेच्या आमदाराच्या गाडीत सापडले 15 कोटी रुपये
पुणे जिल्ह्यातील भोरजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत 15 कोटी रुपयाची रोख रक्कम सापडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी हे पैसे जप्त केले आहेत. पैसे सापडलेली गाडी शिंदेच्या गटातील आमदाराची बोलले जात आहे.
टीव्ही 9 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
खेड शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदीदरम्यान एक इनोव्हा क्रिस्टा गाडी पोलिसांनी तपासासाठी बाजूला घेतली होती. त्यावेळी पोलिसांना मोठी रक्कम या गाडीत आढळून आली. ही रक्कम सांगोल्यातील एका सत्ताधारी आमदाराकडे नेण्यात येत असल्याचे समजते. सध्या पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असून पोलीस व निवडणूक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ‘या निवडणूकीसाठी शिंदे कडून प्रत्येक उमेदवारास 75 कोटी रुपये पाठवले जाणार असून त्याचाच हा पहिला हप्ता होता’, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ”मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. शिंदे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. त्यातील 15 कोटीचा हा पहिला हप्ता! काय बापू… किती हे खोके?”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.