रतन टाटा यांची सून... 13488 कोटींच्या कंपनीची मालकीण, कोण आहे मानसी किर्लोस्कर?
दिग्गज उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. रतन टाटा यांनी आपला उद्योग-व्यवसायच उंच शिखरावर पोहोचवला नाही तर त्यांना टाटा यांचा वारसा देखील जपला. रतन टाटा आज आपल्यात नसले तर त्यांच्या अनेक स्मृति कायम स्मरणात राहाणाऱ्या आहेत.
रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. रतन टाटा यांचे उत्तराधिकारी नोएल टाटा यांची सून मानसी किर्लोस्कर-टाटा यांचं नाव सध्या चर्चेत आहे. मानसी यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे.
कोण आहेत मानसी किर्लोस्कर?
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा फॅमिली आणि टाटा ग्रुपमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. टाटा ग्रुपला यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी आता टाटा फॅमिलीतील नेक्स्ड जेनरेशन सरसावली आहे. अशातच नोएल टाटा यांची सून मानसी किर्लोस्कर-टाटा यांचे नाव देखील चर्चेत आले आहे.
13488 कोटींच्या कंपनीची मालकीण
मानसी किर्लोस्कर यांच्या खांद्यावर आधीच मोठी जबाबदारी आहे. मानसी यांच्याकडे व्यवसाय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. तो टाट फॅमिलीमध्ये इतर कोणत्याही सदस्याकडे नाही. मानसी या दिग्गज व्यावसायिक आणि किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडचे मालक विक्रम किर्लोस्कर यांची कन्या आहे. सन 2022 मध्ये विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर मानसी किर्लोस्कर यांनीच वडिलांचा व्यावसायिक वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मानसी या किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ आहेत. विशेष म्हणजे टोयोटा कारचा बिझनेस भारतात सुरु करण्याचे श्रेय देखील मानसी यांनाच जाते.
मानसी या अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्यांची ओळख नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल टाटा यांच्याशी झाली. पुढे या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. मानसी आणि नोव्हिल हे दोघे सन 2019 मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. लग्न झाल्यानंतरही मानसी किर्लोस्कर यांनी वडिलांच्या पश्चित खांद्यावर पडलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. टोयोटाशी करार करून त्यांनी टोयोटा मटीरियल हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लॉन्च केली. इतकंच नाही तर मानसी यांच्या नेतृत्त्वात रेसिडेंशल कॉम्प्लेक्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स , हॉस्पिटल प्रोजेक्ट पूर्ण झाले.
लाईम लाईटपासून राहतात अलिप्त..
रतन टाटा यांच्याप्रमाणेच त्यांच्या फॅमिलीमधील इतर सदस्य देखील लाईम लाईटपासून अलिप्त राहाणेच पसंत करतात. सन 2019 मध्ये मानसी आणि नेव्हिल टाटा यांचा विवाह समारंभ देखील अत्यंत साध्या पद्धतीने झाला. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी अशा मोजक्याच पाहुण्यांमध्ये मानसी आणि नेव्हिल लग्नाच्या बेडीत अडकले.
नेव्हिल टाटा हे टाटा ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेडचे नेतृत्त्व करत आहेत. याशिवाय नेव्हिल टाटा यांच्याकडे वेस्टसाइड (Westside), स्टार बाजार (Star Bazaar) आणि लँडमार्क स्टोअर्स (Landmark Store) सारख्या मोठ्या ब्रँडचीही जबाबदारी आहे.
मानसी यांच्या खांद्यावर किर्लोस्कर ब्रदर्स (KBL), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (KIL), किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड (KFIL), किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड (KOIL), किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी लिमिटेड (KPCL), किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड (KECL), एनवायर इलेक्ट्रोडाइन लिमिटेड आणि जीजी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेड यांच्यासह किर्लोस्कर ग्रुपच्या अनेक कंपन्यांची जबाबदारी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.