रेड वेलवेटसह एकूण 12 केकमध्ये आढळले कॅन्सरचे घटक! धक्कादायक अहवाल सादर
क्वचितच कोणी असेल ज्याला केक खायला आवडत नसेल. एखाद्या आनंदाच्या किंवा सणांच्या प्रसंगी केक कापले जातात. गोड खाण्यास शौकीन असलेली लोकं केक तसेच वेगवेगळ्या फ्लेवरच्या पेस्ट्रीज खाणे देखील पसंत करतात.
ज्यामध्ये रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट हे अनेक लोकांचे आवडते फ्लेवर आहेत. मात्र, नुकतेच त्यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. रेड वेलवेट सारख्या 12 प्रकारच्या केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळून आल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
अलीकडे, कर्नाटकातील बंगळुरू येथे विविध बेकरींमध्ये विकल्या जाणाऱ्या केकच्या विविध प्रकारांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ज्यात काही केकमध्ये कर्करोगास कारणीभूत हानिकारक घटक आढळून आले आहेत. या अहवालाविषयी सविस्तर जाणून घेऊया-
अहवाल काय म्हणतो?
अहवालानुसार, चाचणी केलेल्या केकच्या काही नमुन्यांमध्ये हानिकारक रसायने आढळून आली आहेत, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के यांनी राज्यभरातील बेकरींना असुरक्षित रसायने आणि पदार्थांच्या वापराविरोधात इशारा दिला आहे. चाचणी केलेल्या 235 केक नमुन्यांपैकी 12 मध्ये अल्युरा रेड, सनसेट यलो FCF, Ponceau 4R, Tartarazine आणि Carmoisin सारखे कृत्रिम रंग आढळून आले, ज्यांचा वापर विहित सुरक्षा मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले होते.
कोणत्या प्रकारच्या केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळून आले?
रंगीत दिसणाऱ्या केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक असण्याची शक्यता अधिक आहे. ज्यात रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट यांसारख्या केकचा समावेश आहे. केकमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगामुळे कर्करोगाची जोखीम जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कृत्रिम रंग कर्करोगाचा धोका कसा बनतात?
प्राण्यांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की काही कृत्रिम रंग कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. ज्यामध्ये लाल 40, पिवळा 5 आणि पिवळा 6 यांसारख्या रंगांमध्ये बेंझिडाइन, 4-एमिनोबिफेनिल आणि 4-अमीनोॲझोबेन्झिन सारख्या कार्सिनोजेनिक सारखी अशुद्धता असू शकते. जे विविध संशोधन अभ्यासांमध्ये कर्करोगास कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले आहे.डॉक्टरांच्या मते, काही बेक केलेल्या वस्तूंमध्ये कृत्रिम रंगांचा समावेश केला जातो. जे विशेषतः पोटाच्या कर्करोगाशी संबंधित असतात. "काही कृत्रिम रंग विषारी आणि कार्सिनोजेनिक असतात, ज्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. अन्नासोबत एकत्रित केल्यावर ते पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण करू शकतात, ज्यामुळे सेरेबेलम आणि ब्रेनस्टेम टिश्यूमधील विशेष पेशींचा नाश होऊ शकतो.केवळ केकच नव्हे कृत्रिम रंगाचा वापर केले जाणाऱ्या इतर पदार्थांच्या सेवनाने देखील कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. याच गोष्टीवरून काही काळांपूर्वी रोडामाइन-बी सारख्या कृत्रिम रंगांच्या वापरामुळे कॉटन कँडी आणि "गोबी मंचुरियन" सारख्या स्ट्रीट फूडवरदेखील बंगळुरूमध्ये बंदी घालण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.