100 रुपयांत प्रचार, बनले आमदार! मंत्रीपदाची शपथ घ्यायला नव्हते कपडे, 100 रुपये उसने घेत गाठली मुंबई
हल्ली आमदार, खासदार व्हायचं म्हटलं तर जनसंपर्क आणि पैसा या दोन गोष्टींशिवाय पान हलत नाही पण सायकलवर प्रचार करुन शंभर रुपयांत आमदार कुणी होऊ शकेल हा..विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट आहे श्रीगोंद्याच्या एका आमदाराची
1972 च्या निवडणुकीत बाबुराव भारस्कर आले होते निवडून
श्रीगोंदा राजकीयदृष्ट्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. इथल्या मतदारांनी अनेकदा राजकीय दिग्गजांना डावलत त्यांच्या मनातील उमेदवारांनाच आमदार केलंय.अलिकडे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे होता आता या मतदारसंघात नेमकं काय होणार हे निकाल लागल्यावर समजेलच पण एख गोष्ट या मतदारसंघाची अशीही आहे की, 1972 मध्ये विधानसभा निवडणुकीत एक राजकीय चमत्कार घडला आणि त्याची आजही राजकीय वर्तुळात चर्चा होते. या निवडणुकीत मूळचे शेवगाव येथील असलेले गांधीवादी विचारांचे नेते बाबूराव भारस्कर निवडून आले होते.
100 रुपये खर्च, सायकलवर प्रचार करून भारस्कर झाले आमदार
मूळचे शेवगाव येथील असलेले गांधीवादी विचारांचे नेते बाबूराव भारस्कर यांना सन 1962 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यावेळी अवघे 100 रुपये खर्च करून आणि सायकलवर प्रचार करून ते आमदार झाले होते.
1972 च्या निवडणुकीत मात्र भारस्कर यांना काँग्रेसने तिकीट नाकारले मात्र, भरलेला अर्ज त्यांना मागे घेता न आल्याने भारस्कर यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. तरीही श्रीगोंदेकरांनी भारस्कर यांनाच विजयी केले. श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी कर्जत तालुक्यातील मिरजगाव गटाला जोडलेला होता.
या गटातील 28 गावे या मतदारसंघात होती. तसेच हा मतदारसंघ सन 1962 ते 977 दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. दरम्यान, भारस्कर यांनी पहिली निवडणूक ही सायकलवर प्रचार करून लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर रोहन यांचा 5 हजार 529 मताधिक्यांनी पराभव केला होता.
1967 च्या निवडणुकीत भारस्कर विजयी
1967 च्या निवडणुकीत भारस्कर यांना काँग्रेस पक्षाने दुसन्यांदा उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी रिपाइंचे ए. जी. शिंदे यांचा 7 हजार 124 मतांनी पराभव केला. 1972 मध्ये पक्षाने भारस्कर यांना उमेदवारी नाकारत ती प्रभाकर शिंदे यांना दिली. त्यांचे निवडणूक चिन्ह बैलजोडी होते तर भारस्कर हे अपक्ष असल्याने त्यांना सायकल हे चिन्ह मिळाले होते. पक्षादेशानुसार, भारस्कर यांनी शिंदे यांचा प्रचार केला. मात्र, निकाल लागला तेव्हा शिंदे यांना 15 हजार 192 तर भारस्कर यांना 19 हजार 853 मते मिळाली होती.सायकल, मोटारसायकलवरून प्रचार आमदार असूनही बाबूराव भारस्कर यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. निवडणुकीत ते कधी सायकल तर कधी स्थानिक नेत्यांच्या मोटारसायकलवर बसून प्रचार करायचे, त्यांना समाजकल्याण मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी मुंबईतून तार आली. त्यावेळी मुंबईत शपथविधीला जायला भारस्कर यांच्याकडे कपडे घेण्यासाठीही पैसे नव्हते. श्रीगोंदा फैक्टरी येथील कान्होजी जंगले यांनी त्यांना कपड्यासाठी 100 रुपये दिले. त्यानंतर ते कपडे घेऊन शपथविधीसाठी मुंबईता रवाना झाले आणि मंत्रीपदाची शपथ घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.