रडतंय म्हणून आधी मारमार मारलं; मग तोंडात मसाला भरलं, 10 महीन्याच्या बाळासोबत आईचं क्रूर कृत्य
बाळाला आई आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते. काही आई तर आपल्या बाळासाठी स्वत:चा जीव देखील द्यायला मागे पुढे पाहात नाहीत. पण अशात कलियुगच्या आईने मात्र या शब्दाला कलंक लागेल असं काम केलं आहे. या आईने आपल्या बाळाला इतका त्रास दिला, जितका कोणी सावत्र आई देखील देणार नाही. या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक आई आपल्या बाळाला कसा त्रास देत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला एका आईने आपल्या बाळाला हातात घेतलं आहे. बाळ रडत आहे म्हणून आई त्या धपाटे घालते. त्यानंतर ही आई एका कोपऱ्यात आपल्या बाळाला मांडिवर घेऊन बसते. तिथे देखील बाळ रडत असतं म्हणून ही महिला पुन्हा पुन्हा त्याला मरते. जे खूपच क्रुर आहे. कधी कधी आई आपल्या बाळाला मस्ती करतं म्हणून एखादा धपाटा लगावते. पण
त्यामागची तिची भावाना आणि पद्धत थोडी वेगळी असते. पण या आईने मात्र ना
आपल्या बाळाचं वय पाहिलं नाही पद्धते. तिने 10 महिन्याच्या आपल्या बाळाला
पटापट आणि खूप वाईट पद्धतीने धपाटे चढवले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बहराइचमध्ये सरकारी शिक्षक असलेल्या मंझनपूरच्या खेरवा (बरौला) येथील सत्येंद्र कुमारने दोन वर्षांपूर्वी श्वेता गौतमशी लग्न केले. लग्नानंतर 10 महिन्यांनी त्यांची मुलगी शान्वीचा जन्म झाला. पण सत्येंद्र सांगतात की, मुलीच्या जन्मापासून श्वेताचा स्वभाव चांगला नव्हता. तिने आपल्या मुलीला ओझे मानले. मुलगी जेव्हा कधी रडायची तेव्हा श्वेता चिडायची आणि तिला मारहाण करायची. ती रडल्यावर तिच्या तोंडात लाल मिरची पावडर टाकत असे, असा आरोप या महिलेच्या नवऱ्यानं केला आहे.
शाळेतून परतल्यावर सत्येंद्रला हा प्रकार कळला आणि परिसरातील लोकांनी त्याची माहिती दिली. याबाबत त्याने घरच्यांना सांगितले, मात्र कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर सत्येंद्रने गुपचूप एक व्हिडीओ बनवला, ज्यामध्ये श्वेता मुलीला मारहाण करताना दिसत होती. सत्येंद्रने हा व्हिडीओ पोलिसांना दाखवला आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कारवाई केली
पोलिस स्टेशन प्रभारी राजकिशोर यांनी सांगितले की, सत्येंद्रने दिलेल्या व्हिडीओ आणि पुराव्याच्या आधारे श्वेता गौतमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्वेताविरुद्ध कलम ३५२, ३५१(२), ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व्हिडीओची सत्यताही पोलिसांकडून तपासली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.