भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का; संजय काकडेंसह 10 आजी-माजी आमदार, 20 नगरसेवक फुंकणार तुतारी
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅक्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला सुरूगं लावणार आहेत.
शरद पवार पुण्यात भाजपला सर्वात मोठा धक्का देणार आहेत. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यासह २० नगरसेवकांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेणार आहेत. या पक्ष प्रवेशाबाबत स्वत: संजय काकडे यांनी यांनी माहिती दिलीय.
संजय काकडे हे दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत. मागील काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान संजय काकडे हे पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते सुरुवातीला अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. २०१९ आणि २०२४ मध्ये पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती.
काय म्हणाले संजय काकडे
पुण्यातील १० आजी-माजी आमदार २० नगरसेवकांबरोबर घेऊन सर्वांना सहकार्य करणाऱ्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती संजय काकडे यांनी साम टीव्हीशी बोलतांना दिली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचं ते म्हणालेत.
दहा वर्षे मी पक्षासाठी खूप काम केलं आहे, पक्षाने माझा कुठेही विचार केला नाही. पुणे शहरामध्ये माझ्यासह कार्यकर्त्यांची गळचेपी झाल्याची खदखद काकडे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, हा भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. समरजितसह घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता संजय काकडे भाजपची साथ सोडणार आहेत. गेल्या १० वर्षात पक्षाकडून काहीही मिळालं नाही. भाजपकडून फक्त वापर झाल. फक्त औपचारिक्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली.शंकर पवार यांना पर्वतीतून उमेदवारी मिळावी यासाठी पवारांना भेटलो त्यावेळी पवार म्हटले तुम्हीही पक्षात या. शरद पवारांच्या ऑफर नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन अंतिम निर्णय झाला. ज्या पक्षात जाईल पक्ष जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी एकनिष्ठेने पार पाडेल. ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांना फडणवीस यांनी आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद ते मला देतील अशी खात्री आहे, असा विश्वासही काकडे यांनी वर्तवलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.