Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

breaking News! UPSC नंतर आता केंद्र सरकारनंही केली पूजा खेडकरची हाकालपट्टी; प्रशासकीय सेवेतून केलं बडतर्फ

Breaking News! UPSC नंतर आता केंद्र सरकारनंही केली पूजा खेडकरची हाकालपट्टी; प्रशासकीय सेवेतून केलं बडतर्फ
 

नवी दिल्ली : युपीएससीला फसवून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युपीएससीनं तिची आयएएसपदावरुन हाकालपट्टी केल्यानंतर आता केंद्रानं तिला तात्काळ प्रभावानं प्रशासकीय सेवेतून बरखास्त केलं आहे.

युपीएससीची कारवाई

अपंगत्वाची अनेक बनावट प्रमाणपत्रं सादर करुन तसंच नावात बदल करुन पुन्हा युपीएससीची परीक्षा देण्याची संधी मिळवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीचा हा सर्व प्रताप उघड झाल्यानंतर आणि माध्यमातून याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्यानंतर युपीएससीनं तिला नुकतंच सेवेतून बडतर्फ केलं होतं.

दिल्ली हायकोर्टात धाव

त्यानंतर तिनं युपीएससीच्या या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. युपीएससीला असा कुठलाही अधिकार नाही तो केवळ केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाला आहे, असं तिनं याचिकेत म्हटलं होतं. यावर सुनावणीनंतर कोर्टानं तिला तात्पुरता दिलासा देत तात्काळ कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात तिची केस सध्या कोर्टात सुरु आहे.

केंद्र सरकारनं केली कारवाई

दरम्यान, आता केंद्र सरकारनंच मोठा निर्णय घेत पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलं आहे. त्यामुळं केंद्रानं केलेली ही कारवाई नियमित स्वरुपात झाली आहे किंवा नाही, हे पाहावं लागणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.