आठवलेंनी काश्मीरमध्ये घडवला इतिहास; RPI च्या 'या' महिला उमेदवाराचीच सर्वत्र चर्चा...
जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 जागांवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे. केंद्रात एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
एका जागेवर त्यांनी उमेदवार उतरवला असून इतर ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला आहे. आठवले यांनी पुलवामातील राजपोरा मतदारसंघात एका महिलेला उमेदवारी दिली आहे. डेजी रैना असे त्यांचे नाव असून राज्यभरात त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. यामागचे कारणही मोठे आहे. डेजी रैना या मागील तीन दशकांतील पहिल्या महिला कश्मिरी पंडित आहेत, ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काश्मीरमध्ये निवडणूक लढवत असलेल्या नऊ महिलांपैकी त्या एक आहेत.
आठवले यांनी पुलवामातील राजपोरा मतदारसंघात एका महिलेला उमेदवारी दिली आहे. डेजी रैना असे त्यांचे नाव असून राज्यभरात त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. यामागचे कारणही मोठे आहे. डेजी रैना या मागील तीन दशकांतील पहिल्या महिला कश्मिरी पंडित आहेत, ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काश्मीरमध्ये निवडणूक लढवत असलेल्या नऊ महिलांपैकी त्या एक आहेत.
पुलवामा हा भाग कधीकाळी हिज्बुल मुजाहिदीनचा या दहशतवादी संघटनेचा गड मानला जात होता. याच मतदारसंघात रैना आपले नशीब आजमवत आहेत. त्या दिल्लीत एका खासगी कंपनी नोकरी करतात. तर पुलवामातील फ्रिसल या गावच्या सरपंचही आहेत. आठवले गटाच्या त्या एकमेव उमेदवार आहेत.युवकांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढवत असल्याचे रैना यांनी सांगितले. मी सरपंच म्हणून काम करत असताना युवकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणताही दोष नसताना युवकांना त्रास सहन करावा लागत आहे. 90 च्या दशकात जन्माला आलेल्या मुलांना केवळ बंदुकीच्या गोळ्या पाहायला मिळाल्या, असे रैना यांनी 'एनडीटीव्ही'शी बोलताना सांगितले.पुलवामामध्ये कोणत्याही सुरक्षेशिवाय मी काम करण्यासाठी फिरत होते. माझ्याकडे कोणतीही खासगी सुरक्षाव्यवस्था नाही. काही लोक सुरक्षा घेतात, पण मी नाही. पुलवामामध्येही अनेक वर्षांपासून काम करत आहे. मुस्लिमांकडून मला पाठिंबा मिळतो, त्यांच्याशीही मी काम केल्याचे रैना म्हणाल्या.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभेची निवढणूक होत आहे. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याआधीपासून म्हणजे 2018 पासून राज्यात राज्यपाल कारभार पाहतात. आता तीन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीनंतर राज्यात नव्या सरकारची सत्ता येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.