भाजप सरकारमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न मणिपूर आणि महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांवरून उपस्थित होत आहे. पण फक्त मणिपूर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेश आणि ओडिशातही महिला सुरक्षित नसल्याचा ताज्या घटना समोर आल्या आहेत. आताची घटना ही ओडिशातील आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातच महिलेसोबत पोलीस अधिकाऱ्याने अश्लील वर्तन केल्याची किसळवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील बडगोंदामध्ये काही दिवसांपूर्वी लष्करी अधिकाऱ्याच्या मैत्रिणीवर अत्याचाराची घटना घडली होती. आता भाजपच सरकार असलेल्या ओडिशातील भुवनेश्वरमधील भरतपूर पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. गुंडांविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेसोबत पोलीस अधिकाऱ्यानेच अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. हा सर्व किळसवाणा प्रकार पीडित महिलेने माध्यमांसमोर सांगितल्यानंतर 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. भरतपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक (आयसीसी) दिनकृष्ण मिश्रा, उपनिरीक्षक बैसालिनी पांडा, सहायक उपनिरीक्षक सलिलामोयी साहू आणि सागरिका रथ आणि कॉन्स्टेबल बलराम हांडा यांना निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित महिला ही एका लष्करी अधिकाऱ्याची होणारी पत्नी आहे. तसेच ती एक वकीलही आहे. पीडित महिला रेस्टॉरंट बंद करून लष्करी अधिकाऱ्यासोबत घरी परतत होती. 15 सप्टेंबरला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ती रेस्टॉरंट बंद करून घरी निघाली होती. वाटेत काही गुडांनी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्या गुंडांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मागण्यासाठी पीडित महिला आणि लष्करी अधिकारी (पीडितेचा होणारा पती) हे भरतपूर पोलीस ठाण्यात गेले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी महिला पोलिसांनी पीडितेलाच मारहाण केली. पीडितेचे केस पकडून तिला मारहाण केली आणि हातपाय बांधून एका रुममध्ये बंद केले. यावेळी पोलिसांना रोखणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याला म्हणजे पीडितेच्या होणाऱ्या पतीला लॉकअपमध्ये बंद केले.
काही वेळाने एका पोलीस अधिकारी आला आणि तिचे अंतर्वस्त्र काढून छातीवर लाथा मारला. त्यानंतर सकाळी सहा वाजता एक अधिकारी आला. त्याने माझी पॅन्ट खाली ओढली. त्यानंतर त्याने त्याची पॅन्ट खाली खेचली, त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवत आणि अश्लील भाषा वापरली. यावेळी मी मदतीसाठी जोरजोरात ओरडत होते, असे पीडित महिलेने माध्यमांना सांगितले. घडलेला प्रसंग सांगताना पीडितेला यातना झाल्या. रडत रडत तिने माध्यमांना सगळी घटना सांगितली.
दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडितेचा शारीरिक छळ झाल्याची पुष्टी झाली असून तिच्यावर सध्या एम्स-भुवनेश्वरमध्ये उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर शारिरीक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलीस महासंचालक वायबी खुरानिया यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.