Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाश्त्याला आवडीने पोहे खाताय? 'हा' प्रकार पाहून पोहे खाताना १०० वेळा विचार कराल; पाहा किळसवाणा PHOTO

नाश्त्याला आवडीने पोहे खाताय? 'हा' प्रकार पाहून पोहे खाताना १०० वेळा विचार कराल; पाहा किळसवाणा PHOTO
 

अनेकांना नाश्त्यात पोहे खायला आवडतात. भारतात अनेक ठिकाणी पोहे हे आवडीने खाल्ले जातात. पोहे हा पटकन तयार होणारा पदार्थ आहे. चवीसोबतच तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

त्याच्या सेवनाने आपण तंदुरुस्त तर होतोच; पण वजन कमी करण्यासही हा खाद्यपदार्थ उपयुक्त आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात आढळते आणि त्यात शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वेदेखील असतात. सकाळच्या वेळी लोकांना पोहे खायला आवडते. कारण- ते सहज पचतात. मात्र, हेच पोहे खाल्ल्याने आता तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हीही नाश्त्याला आवडीने पोहे खात असाल, तर हा प्रकार वाचाच. हा प्रकार पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ, तसेच खराब पदार्थ हाती लागण्याच्या शक्यतेबाबतची माहिती आपल्याला वारंवार मिळत असते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कल्पना करा की, तुम्ही पोहे तयार करीत आहात आणि अचानक तुम्हाला भांड्यात जिवंत अळ्या दिसतात. जबलपूरच्या पाटण भागातील पुष्पेंदर सिंग याच्यासोबत असेच घडले.

तीन दिवसांपूर्वीच त्यांनी शेजारच्या दुकानातून पोह्याचे पाकीट विकत घेतले. रविवारी पोह्याचे पाकीट उघडले असता, त्यात सर्वत्र जिवंत अळ्या पाहून त्यांना धक्काच बसला. पोह्याच्या या पॅकेटची उत्पादन तारीख २६ जुलै २०२४ आणि मुदत संपण्याची तारीख १ जानेवारी २०२५ आहे. त्यानुसार पुढील चार महिने हे पोहे खाण्यायोग्य असायला हवे होते. मात्र, अशा प्रकारे त्या पाकिटात जिवंत अळ्या आढळल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पोह्यांच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या सापडल्याने गुणवत्ता नियंत्रणाच्या उपाययोजना आणि अशा उत्पादनांच्या सेवनाशी संबंधित संभाव्य आरोग्य धोके यांबद्दल गंभीर चिंता निर्माण होते. ग्राहकांना सुरक्षित आणि भेसळविरहित अन्न उत्पादने प्रदान केली जाणे आवश्यक आहे. परंतु, अशा घटनांमुळे अन्न उद्योगाला ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आणि स्वच्छता व गुणवत्ता राखण्यासाठी जागे करण्याची गरज आहे.

पाहा किळसवाणा फोटो

अलीकडे, जबलपूरच्या कटंगी शहरात किराणा दुकानातून विकत घेतलेल्या मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे होते. याचा किळसवाणा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला होता. अनेक खाद्यपदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. टीव्हीवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातींना बळी पडून आपण दोन मिनिटांत आपल्या आरोग्याचे अनारोग्य करण्यास कारणीभूत ठरतो की काय, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.