स्वप्नावर आधारित FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
एका मुलाच्या स्वप्नात मृत्यू झालेली व्यक्ती येते आणि मदतीचे आवाहन करते. पाहिलेले स्वप्न हा तरुण पोलिसांना सांगतो. पोलीस ही त्याच्या जबावार एफआयआर नोंदवतात आणि तपास करतात. तपासात खरंच एक कुजलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिसही चक्रावून जातात. एखाद्या सस्पेन्स, हॉरर- थ्रिलरपटाची ही गोष्ट नसून आपल्या कोकणात घडलेली ही घटना आहे. आता, पोर्लीस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत. मात्र, समोर आलेल्या या घटनेची एकच् चर्चा सुरू झाली असून विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले. त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे.अशाच प्रकारची एक नोंद पोलिसांच्या एफआयआर मध्ये सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांच्या एफआयआर नुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी योगेश पिंपळ आर्या (30) हौ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, 'मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.'
योगेश आर्या च्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली. त्यावेळी भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिक्च्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगार्ची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून 5 फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढौपराजवळ एआयआर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.