Breaking News! निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला! लवकरच तारखा जाहीर होण्याचे संकेत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक सध्या झारखंड दौऱ्यावर आहे. यानंतर लवकरच म्हणजे गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांसह त्यांचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती ECI चे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावरून महाराष्ट्रात लवकरतच विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात वेळेवर निवडणुका घेऊ : ECI
ECI चे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, परवा आपण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहोत, त्यानंतर बसून निर्णय घेऊ आणि वेळेवर निवडणुका घेऊ..." असे त्यांनी स्पष्ट केले.
ECI पथकाने घेतल्या अधिकाऱ्यांच्या भेटी
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांचे पथक सोमवार (दि.२४ सप्टेंबर) आणि मंगळवार (दि.२५ सप्टेंबर) झारखंड दौऱ्यावर होते. दरम्यान, राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने यावर्षी होणाऱ्या झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आयजी, डीआयजी, डीईओ आणि एसपी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील निवडणूक दौऱ्याबाबात माहिती दिली.
ECI चा झारखंड दौरा आटोपला, पक्षांनी केल्या अनेक मागण्या
झारखंडमधील आगामी निवडणुकांसाठी आम्ही गेल्या २ दिवसांपासून आढावा घेतला. आम्ही पहिल्यांदा राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राजकीय पक्षांनी मांडलेल्या मागण्या आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत याबाबत आम्ही एक प्रेस नोट प्रसिद्ध केली. यावेळी सर्व पक्षांनी बूथवर 100% सीसीटीव्ही पाळत ठेवण्याची मागणी केली. पक्षाच्या प्रतिनिधींना काढून टाकले जाऊ नये आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात," असे मत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.