Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुणाला मुर्ख बनवताय? पंतप्रधान मोदींच्या वासरासोबतच्या फोटोवर प्रकाश राज यांची टीका

कुणाला मुर्ख बनवताय? पंतप्रधान मोदींच्या वासरासोबतच्या फोटोवर प्रकाश राज यांची टीका
 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वासरासोबत फोटो शेअर केला होता. पण भाजपने बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे पैसे घेतले, हे लोक कुणाला मुर्ख बनवत आहेत असा सवाल अभिनेते प्रकाश राज यांनी विचारला आहे.

तसेच एकीकडे मणिपूर जळतंय आणि हे फोटोशूट करण्यात व्यग्र आहेत असेही प्रकाश राज म्हणाले.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. पंतप्रधान मोदींनी या वासराला दीपज्योती नाव दिले आहे. त्याचा व्हिडीओ प्रकाश राज यांनी रीट्विट केला आहे आणि म्हटले आहे की जेव्हा तुम्ही नॉनबायोलॉजिकल असता आणि तुम्हाला शूटिंग करण्यासाठी भरपूर वेळ असतो. एकीककडे मणिपूर जळतंय आणि दुसरीकडे यांनी बीफ एक्सपोर्ट करणाऱ्यांनी इलेक्ट्रोल बॉण्डमधून भरपूर पैसे कमावले आहेत. दुसऱ्या एका ट्वीटमधून प्रकाश राज म्हणाले की हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते कुणाला मुर्ख बनवत आहेत असा सवालही प्रकाश राज यांनी विचारला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.