Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वकिलाविरोधात ॲट्रोसिटीसह बलात्कार, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल; पीडितेचे अश्लिल व्हिडिओ काढून करीत होता ब्लॅकमेल

वकिलाविरोधात ॲट्रोसिटीसह बलात्कार, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल; पीडितेचे अश्लिल व्हिडिओ काढून करीत होता ब्लॅकमेल
 

कामानिमित्ताने घरी बोलावून चहात गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर पीडितेवर अत्याचार करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. ते चित्रीकरण सोशल मीडियासह पीडितेच्या कुंटूंबियांना दाखवून बदनामीची धमकी देत पाच वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या वकीलाविरोधात नाशिकरोड पोलिसात ॲट्रोसिटी, बलात्कार आणि अवैध सावकारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲड. संजय हरिप्रसाद कनोजी (रा. तनिश पार्क, जेलरोड) असे संशयित वकीलाचे नाव असून, त्यास मंगळवारी (ता. ३) रात्री अटक करण्यात आली आहे.  पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, पीडितेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून, २०१९ मध्ये पीडिता संशयिताच्या घरी त्याच्या पत्नीचे फेशियल करण्यासाठी गेल्या असता ओळख झाली. त्यानंतर कोरोनामुळे पीडितेची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाल्याने संशयिताने घरी बोलाविले. 

गुंगीमिश्रीत चहा पिण्यास दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व तिच्या कुटूंबियांना दाखविण्याची धमकी देत संशयिताने आजतागायत वारंवार पीडितेवर अत्याचार केले. मुंबई, गोवा, पालघर, त्र्यंबकेश्वर, पहिने याठिकाणी नेऊन पीडितेच्या इच्छेविरोधात अत्याचार केले. 

तसेच, पीडितेच्या पतीच्या आधारकार्डवर स्वत:चा फोटो चिकटवून त्याचा गैरवापर केला. जातीवाचक बोलून वारंवार अपमान केला आणि २५ हजार रुपये व्याजाने देऊन त्यामोबदल्यात त्याच्या कामाच्या मोबदल्यातून व्याजासह हजार रुपये कापून घेत होता. अशारितीने संशयिताने अनेकांना गंडविले व महिलांवर अत्याचार केल्याचा दावाही पीडितेने केला आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयित वकील कनोजे याच्याविरोधात बलात्कारासह अवैध सावकारी प्रतिबंधात्मक, व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी हे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.