Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संडासची मेन पाईपलाईन फुटली आणि मग....

संडासची मेन पाईपलाईन फुटली आणि मग....
 

चीनमधील एक अजब घटना सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २४ सप्टेंबर रोजी चीनमध्ये नवीन लावण्यात आलेला सीवेज पाईप म्हणजे संडासचा पाईप फुटला, ज्या मानवी विष्ठा ३३ फूट वर हवेत उडाली आणि रस्त्यावर सगळीकडे पसरली.

व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे पाईप फुटल्यावर घाण वर उडाली आणि गाड्यांवर व रस्त्यावर पसरली.

द सनच्या रिपोर्टनुसार, चीनच्या नानिंगमध्ये सीवेज टॅंक पाईप फुटला. त्यावेळी त्याचं दबाव परीक्षण सुरू होतं. इंजिनिअरद्वारे या सीवेज पाईपच्या दबावाचं परीक्षण केलं जात होतं. डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओत दाखवण्यात आलं की, कशाप्रकारे पाईप फुटल्यावर घाण उंचच उंच उडाली. यादरम्यान घाणीमुळे एका कारचा विंडशील्ड जवळपास तुटलं होतं. सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही.

लोक या व्हिडिओवर अनेक गंमतीदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'फक्त व्हिडीओ पाहूनच मला दुर्गंधी जाणवत आहे'. पाईप फुटल्यानंतर कुणालाही इजा झाली नाही. पण अनेक गाड्या आणि रस्त्याचं नुकसान झालं. काही रिपोर्टनुसार, यामुळे झालेल्या दुर्गंधीबाबत काही लोकांनी तक्रार केली आहे. एका ड्रायव्हरने तक्रार दिली की, त्याची कार पिवळी झाली आहे आणि त्यातून दुर्गंधी येत आहे. मी ही कार आता वापरू शकत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.